मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुलाने प्रॉपर्टीसाठी मातेवर आणि बहिणीवर अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध आईला जबरदस्तीने वृद्धाश्रमात डांबलं. तर बहिणीला मानसिक आजारी असल्याचे कारण देत जबरदस्तीने मनोरुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी तरुणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील वडगावशेरीतील सिंह हाऊसिंग सोसायटीत ही धक्कादायक उघडकीस आली आहे. आरोपी धर्मेंद्र राय या व्यक्तीने आपल्या बहिणीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने मनोरुग्णालयात दाखल केले.
तसेच वयोवृद्ध आईने घरावरून हक्क सोडण्यास नकार दिला म्हणून तिलाही जबरदस्तीने वृद्धाश्रमात नेऊन ठेवण्यात आले. यामागचा हेतू घर त्यांच्या नावावर करून घेणे असल्याचे समोर आले आहे.
या महिलेने मनोरुग्णालयातून आपल्या मैत्रिणींना सांगून सुटका करून घेतली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. अखेर पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र राय याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
या प्रकरणात आरोपीने प्रॉपर्टीसाठी आई आणि बहिणीवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.
आरोपीला अटक करण्यात आली त्याला न्यायालय समोर हजर केले. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पैशांसाठी माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.आई आणि बहिणीसोबत प्रॉपर्टीसाठी केलेला हा छळ हा समाजाच्या आरश्यातला काळा कोपरा दाखवणारा आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज