टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारूच्या नशेत पत्नीकडे सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्यांनी मारहाण केली. तर भांडणात भावजीने मेव्हण्याच्या मानेला, काखेत चावला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी मंगळवेढा पोलिसांत परस्परविरोधात फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
बुधवारी (ता. २) मद्यपान करून रात्री पावणेअकराच्या सुमारास दत्तराज मेकअप्पा मोरे (रा.एकवीरानगर, ता. मंगळवेढा) हा सासुरवाडीला गेला.
पत्नीशी झोंबाझोंबी करणारा दत्तराज तिला लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न करताना सासुरवाडीच्या लोकांनी त्याला पकडले.
सासुरवाडीतील नरेश नवघरे, बानू नवघरे, बायडा, माधुरी नवघरे (रा.जुनोनी, ता. मंगळवेढा) यांनी मिळून मारहाण केल्याची फिर्याद दत्तराज मोरे यांनी पोलिसांत दिली.
दुसरीकडे दारू पिऊन आलेला दत्तराज बहिणीला शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यावेळी त्याला धरताना त्याने चावा घेतल्याची फिर्याद मेव्हणा नरेश नवघरे यांनी पोलिसांत दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज