mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

छावणी घोटाळ्यात विरोधाकातील काही संचालक आज जेल मध्ये दिसले असते; समविचारीवर आ.आवताडेंनी डागली तोफ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 10, 2022
in मंगळवेढा
छावणी घोटाळ्यात विरोधाकातील काही संचालक आज जेल मध्ये दिसले असते; समविचारीवर आ.आवताडेंनी डागली तोफ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

समविचारीतील उमेदवार कारखाना लुटाच्या खाणीच्या दृष्टीने बघत आहेत. यांचा डाव सभासद हाणून पाडतीलच, तसेच छावणी घोटाळ्यात विरोधकांतील काही संचालक हे जेल मध्ये दिसले असते असा खोचक टोला आमदार समाधान आवताडे यांनी समविचारीला लगावला आहे.

श्री.संत दामाजी शेतकरी विकास आघाडीच्या विजय निश्च़य सभे प्रसंगी आठवडा बाजार येथे ते बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, माजी  नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रेड्डी, प्रा. येताळा भगत, अँड. बापूसाहेब मेटकरी, पांडुरंग जावळे ब्रह्मपुरीचे माजी सरपंच तानाजी पाटील, गुंजेगावचे सरपंच मेटकरी, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांनी संत दामाजी शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

आ.आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, छावणी घोटाळ्यातील काही संचालक आता उभे आहेत. सभासद त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

टीकाटिप्पणी खरे असावे खोटे आरोप करून बोलू नये आरोप करताना विरोधकांनी कारखान्यासंबंधित बोलायला हवे होते.

दुष्काळाचे सावट असताना साखर धंद्यावर मोठे अडचणी होत्या. दुष्काळ होता, ऊसाची उपलब्धता नव्हती. या खडतर प्रवासातून मार्ग काढत तुमच्या विश्वासावर गेली 6 वर्षे कारखाना सुसाट चालला.

कामगारांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून
आम्ही प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार करून पैशाची बचत केली आहे. बंद पडलेल्या टर्बो पंप आम्ही सुरू केला . त्यामुळे कारखान्यातील लोड कमी झाला.

गेल्या 6 वर्षात दिलेले वचन पूर्ण केले. सभासदांना 1 लाखाचे विमा कवच दिले. कारखान्यात कामगारांचे फरमोठे योगदान आहे. कामगार युनियनला विनंती केली, ऑफ सिजन मध्ये कामावर आलेल्या कामगारांना 75 टक्के पगार तर घरी बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील 40 टक्के पगार दिला गेला आहे. सर्व कामगारांनी योगदान दिले आहे. सर्वांच्या वतीने त्यांनी आभार देखील मानले.

कामगार उपोषण संदर्भात चुकीचा प्रकार घडला आहे. गेली 6 वर्ष कामगार संचालक एकत्रित पणे काम करत आहेत. आमच्या संचालक मंडळाने दोन वेळा कामगारांना पगारवाढ दिली आहे.

कारखान्याच्या चार सर्वसाधारण सभा व्यवस्थित झाल्या. लाखो रुपये पोलीस संरक्षणासाठी लागत होते. ते वाचवले. सभेत सर्वांना बोलायचा अधिकार दिला. कारखान्याच्या हिताच्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही त्या मार्गी लावल्या.

शेतकऱ्यांना 85 टक्के बिल एफआरपी प्रमाणे दिले आहे. थोडं पुढे-मागे झाले आहे, नुसत्या साखरेच्या उत्पादनावर आम्ही बिले दिले आहेत. 1 लाख लिटर क्षमतेची डिसलेरी उभी राहणार आहे. पुढच्याच महिन्यात याचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिसलेरी सुरू झाल्यानंतर ऊस बिले, कामगार पगार वेळेवर देता येतील. पुढच्या पाच वर्षात कारखाना कर्जमुक्त होणार आहे.

स्व.मारवाडी वकील यांच्या ताब्यातील कारखाना स्व.चरनू काका पाटील यांच्या ताब्यात घेताना कारखान्यावर 38 कोटींचे कर्ज होते. तर स्व.भारत भालके यांच्या ताब्यात आल्यावर कर्ज 68 झाले होते.

दामाजी कारखाना आमच्या ताब्यात घेताना तेच कर्ज 145 कोटींचे कर्ज करून ठेवले होते. 100 कोटींच्या पुढे कर्ज कसे वाढले ? कारखान्यात काहीच नवीन न बसवता एवढे कर्ज झाले कसे? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

हा फसवा कार्यक्रम आहे. कारखान्याला 100 कोटींचा चुना यांनी लावला आहे.  तर महिन्याला 25 लाख रुपये कोणाला देत होते. प्रत्येक गोष्टींची उत्तरे यांना द्यावी लागणार आहेत.

20 वर्ष कारखान्याची डिसलेरी बीओटी तत्त्वावर 150 कोटीला देण्याचा घाट घातला होता. आम्ही तो हाणून पाडला.   145 कोटींचा बोजा घेऊन आम्ही कारखाना चालवला आता फक्त 72 कोटींचा बोजा राहिला आहे.

यांच्याच काळात चोरून साखर विक्रीची साखर कामगारांनी अडवली होती. भूलथापा मारून सभासदांचा विश्वास घात करण्यासाठी आता पुढे येत आहेत.

आम्ही शासनाला अवहाल पाठवून 19 हजार सभासदांच्या नोटिसा रद्द केल्या. त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. विरोधकांनी चुकीचा प्रचार करून याचा बाव केला आहे.

समविचारीतील काही उमेदवार मी चेअरमन म्हणून गुडग्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. कामगारांना दम देऊन उपोषणाला बसवले जात आहे ..असली दमबाजी करू नका सभासद तुमची लायकी दाखवतील.

छोटीशी पतसंस्था चालवता येत नाही. एवढा मोठा कारखाना कसे चालवणार असा टोलाही त्यांनी शिवानंद पाटील यांना लगावला आहे.

जातीचे गणित नाही तर माणुसकीचे गणित असेल तरच विजयी मिळवता येतो. कारखान्याच्या पैशावर काही संचालकांनी स्वतःची लग्ने लावली. आता सभासदच यांची वाट लावतील.

जो चेक देईल तो वाटला पाहिजे असा कारभार केला.. कोणताच चेक बोउन्स होऊ दिला नाही. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण लोकांची दिशाभूल हे करत आहेत. मी माझा सत्याचा मार्ग सोडणार नाही. यांनाच सत्याच्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न करणार आहे.

साखरेचे टेंडर ऑनलाइन केले. यांच्या कार्यकाळात तीन दिवस टेंडरला लावायचे.फक्त 10 मिनिटांत टेंडर होत होते. राहिलेले दिवस नुसती मौजमजा करण्यासाठी कारखान्याच्या पैशाचा वापर केला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

शशिकांत चव्हाण बोलताना म्हणाले की, आमदार समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांच्यात कसलाही वाद नाही. विरोधक लोक जाणूनबुजून वाद असल्याचे भासवत आहेत.

विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत पण सभासद हुशार आहेत. त्यांच्या आशा खोट्या आश्वासनाना भुळणार नाहीत. त्यांची जागा सभासदच दाखवून देतील.

कारखाना गेली सहा वर्षे विना अडथळा सुरू होता. इथून पुढेही अधिक जोमाने सुरू राहणार आहे.  कारखाना विरोधकांच्या ताब्यात जर गेला तर दामाजीचा विठ्ठल केल्याशिवाय ही मंडळी गप्प बसणार नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

प्रा.भगत बोलताना म्हणाले की, दामोदर देशमुख यांनी चोरीचा युरिया खरेदी करून शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे पाप करत होते. पण पोलिसांनी त्यांना पकडून जेल मध्ये टाकले हे काय विकास करणार.

अजित जगताप यांनी बोलताना सत्यता पडताळावी आपण केलेले भ्रष्टाचार आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत.
बंद पडणाऱ्या योजना चालू करणारा आमदार आहे.. टक्केवारी खाणारा आमदार नाही.

राजकारण करत असताना पोटची मुले दुसऱ्याच्या नावावर अजित जगतापांनी लावली.. लाज वाटायला हवी होती असे करताना अशी खरमरीत टीका प्रा.भगत यांनी केली.

पांडुरंग जावळे बोलताना म्हणाले की, कामगारांच्या वर दादागिरी करून त्यांना उपोषण करण्यास भाग पाडले जात आहे. 2010 ते 2015 मध्ये या काळात कोट्यावधी रुपयांची मळी वाहून गेली, त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, स्व.भारत भालके यांनी ज्याची लायकी नसताना त्यांना चेअरमन केले ते त्यांचे झाले नाहीत. तर जनतेचे कसे होतील.

कारखान्याच्या पैशातून उभारलेल्या एका उमेदवारांने स्वतःचे लग्न वाजतगाजत केले. अजित जगताप व अँड.नंदकुमार पवार यांनी आपण केलेल्या भ्रष्टाचार बोलावे सभासद हुशार आहेत ते तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

कारखान्यात भ्रष्टाचाराची सुरुवात 2003 ते 2005 कालावधी झाली. त्या संचालक मंडळांनी 8 कोटीचा भ्रष्टाचार केला. ते संचालक मंडळ शासनाने बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आले. याबद्दल माजी चेअरमन नंदकुमार पवार यांनी स्पष्ट करावे.

आपला नैतिक अधिकार नाही भ्रष्टाचारावर बोलायचा ते स्वतः यामध्ये भरबडलेली आहेत.  त्यांनी यावर बोलायचे म्हणजे स्वतःचे हसू केल्यासारखे होईल.

10 लाख रुपये महाराष्ट्र बँकेतील स्वतःच्या मुलाचे लग्नासाठी कोणी वापरले त्यांचेच उमेदवार आज उभे आहेत यावर अँड.नंदकुमार पावर का बोलत नाहीत?

2005 ते 2010 या कालावधीत 36 महिन्याचा पगार कामगारांचा राहिला होता. 42 महिन्याचा फंड भरायचा राहिला होता. जर त्यावेळी आपण 36 महिन्याचा पगारासाठी थांबत होता,

तर आज 6 महिन्याच्या पगारासाठी कामगारांनी थोडे सहकार्य करावे आशा अविचारी लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका येणाऱ्या काही दिवसातच संपूर्ण पगार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

सभासदांनो! दामाजी कारखान्याची दिवाळी सणाच्या साखरेचे वाटप ‘या’ दिवसापासून सुरू होणार; चेअरमन शिवानंद पाटील यांची घोषणा

October 11, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा महिलाराज येणार; प्रश्नांची जाण असलेल्या महिलेचा शोध घ्यावा लागणार; पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

October 11, 2025
एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

October 11, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बापरे..! मंगळवेढ्यात असलेल्या ‘या’ बँकेत ठेवीदारांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी; शाखेत ‘एवढ्या’ कोटींच्या ठेवी; ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट

October 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! दिव्यांग मुलाचे हाल बघवेना; आईची मुलासह विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला

October 10, 2025
Next Post
मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपत जाण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

आमदार तानाजी सावंतांचा ठाकरेंना झटका; सोलापूर शिवसेनेचा मोठा गट मुख्यमंत्री शिंदेंच्या गोटात

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा