टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.
यावर्षी जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.
पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.
लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत,
याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले.
जगभरातील प्रतिभावान शिक्षकांना एकत्र आणून जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी यामुळे मिळते.
अमेरिकेतील शिक्षणपद्धती जवळून अभ्यासण्याची संधी यामुळे मिळते ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज