टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस , अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा व सांगोल्याचे १२ गट अनुसूचित जाती तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद मतदारसंघात वाढ होऊन ७७ इतकी संख्या झाली आहे. यामधून २८ जुलै रोजी एक गट अनुसूचित जमातीसाठी तर अनुसूचित जातीसाठी १२ गट राखीव जाहीर केले जाणार आहेत.
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने गट आरक्षित केले जाण्याची शक्यता आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात दोन ऐवजी तीन जिल्हा परिषद गट झाले असून बीबीदारफळ गटात मार्डी गणाचा समावेश करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ७७ गटातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत उतरत्या क्रमाने बीबीदारफळ गट पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे बीबीदारफळ गट अनुसूचित जातीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे.
अनुसूचितसाठी अनुसूचित जातीच्या उतरत्या क्रमानुसार गट आरक्षित केले तर माळशिरस, अक्कलकोट, मोहोळ उत्तर सोलापूर , दक्षिण सोलापूर ,अनुसूचित अनुसूचित सांगोला व करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ राखीव होतील.इतर मागासवर्गीयांचे आरक्षित गट वेगळे असतील,(स्रोत:लोकमत)
मार्डी गण अनुसूचितसाठी
उत्तर तालुक्यातील ६ गणापैकी मार्डी गणात अनुसूचित जातीची सर्वाधिक ४ हजार ६४१ लोकसंख्या आहे. याशिवाय मार्डी गण २००२ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता. त्यानंतर तिर्हे ( २००७ ) , नान्नज ( २०१२ ) व सध्या बीबीदारफळ ( २०१७ ] राखीव झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी मार्डी गण जातीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे.
माळशिरस तालुक्यातील बोरगाव गटात अनुसूचित जातीची सर्वाधिक ८ हजार ४७ तर माळीनगर गटात ८ हजार ४१ इतकी लोकसंख्या आहे.
अक्कलकोट तालुक्यातील मंगरुळ गटात ७,११५ , जेऊर गटात ७,१०५ , उत्तर तालुक्यातील बीबीदारफळ गटात ७ हजार ३९ , पेनूर ( मोहोळ ) ७ हजार ३२ , मांडवे ६,८०० ,
दहिगाव ६,६४२ , यशवंतनगर ६,६३ ९ , चपळगाव ६ ४ ९ ८ , भंडारकवठे ६,२४७ व अकोला ( सांगोला ) तसेच पांडे ( करमाळा ) या दोन्ही गटात समान ६ , ४१५ इतकी लोकसंख्या आहे. हे १३ मतदारसंघ असले तरी १२ गट अनुसूचित जातीसाठी राखीव करायचे आहेत.
जि.प.मधील प्रवर्गनिहाय जागा ?
एकूण जागा ७७
■ अनुसूचित जाती : १२ ( ६ महिला )
■ अनुसूचित जमाती : १ ( १ महिला )
■ ओबीसी : २० ( १० महिला )
■ सर्वसाधारण : ४४ ( २२ महिला )
पंचायत समित्यांमध्ये २४ जागा ?
पंचायत समितीच्या गणांमध्ये एकूण १५४ जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी २४ ( १२ महिला ), अनुसूचित जमाती ०१ ( ०१ महिला ) ,
ओबीसी ३६ ( २२ महिला ), सर्वसाधारण ( ४२ महिला ) असे आरक्षण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज