टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षेची सुरुवात सोमवारी करण्यात आली.
मात्र सोमवारी बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यानंतर विद्यापीठाने वेळ वाढवून दिला होता.दरम्यान काल सारखी तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांना आजही येत असल्याने पालक व विद्यार्थ्यांना कडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो प्रचंड ट्राफिक मुळे सध्या लोगिन बंद केलेले आहे . कृपया आज दुपारी 04:00 नंतर लोगिन करावे . प्रत्येक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल अशी खात्री विद्यापीठाद्वारे करण्यात येणार आहे. आता हा संदेश विद्यार्थ्यांना लॉगिन केल्यानंतर येत असल्याने या विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वैतागले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेला सुरवात केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वैतागले आहेत. आता यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने परीक्षेचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आजही आहे.
बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पेपर देताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मनात आता भिती निर्माण झाली असून त्यांना नापास होईल की काय, असे वाटत आहे.
विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी ‘एमसीक्यू’चे 50 प्रश्न दिले असून त्यासाठी 90 मिनीटांचा वेळ दिला आहे. मात्र, विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे buffring ध्ये गेल्याचे दिसत आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दिलेल्या हेल्पलाईनवरुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचेही विद्यार्थी सांगू लागले आहेत. दरम्यान, पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
पेपर सोडविताना येणाऱ्या अडचणी…
एका पेजवरील प्रश्न सोडवून दुसऱ्या पेजवर जाताना कृपया येथे क्लिक करा म्हणून पुन्हा आधीच्या पेजवर लिंक फॉरवर्ड होत आहे
सुरुवातीचे काही वेळ लॉगिन करताना सर्व्हर डाउन; प्रश्न दर्शविताना पेज लोडवर जाते, तरीही परीक्षेचा वेळ कमी दाखवितो.
जे विद्यार्थी दोन विषयांची परीक्षा देत आहेत, त्यांना एक पेपर सबमिट झाल्यानंतर दुसऱ्या विषयाचा पेपर देताना मागील विषयाचा वेळ दाखवितो.
काही विद्यार्थ्यांचा परीक्षा सुरु होऊन साईट पूर्णपणे बंद झाली; त्यानंतर शून्य प्रश्न सबमिट केले म्हणून कम्प्लिटेड असा मेसेज येतोय 502 बॅड गेट-वे अशी त्रुटी वारंवार येत आहे.
एका पेपरसाठी 90 मिनिटांचा वेळ असतानाही अवघे मिळाले 16 मिनिटेच तांत्रिक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत अंतिम वर्षातील एटीकेटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली आहे.
विद्यार्थ्यांना काही अडचणी व समस्या असल्यास श्री गुंडू- 9623412484 , श्री अलदार- 8275894911 , श्री स्वामी -8983930703 , श्री देशमुख 9767198594 , श्री टिक्के -8010093831 , श्री पांढरे- 8010462681 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा , असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.
The online confusion of the final exam is over! Technical difficulties again on Solapur University’s examination portal; The students were annoyed
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज