महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोलापुरातही मुसळधार पावसाचा परिणाम विद्यापीठांच्या परीक्षेवर झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Solapur University postpones exams again! Online exam canceled due to natural calamity
अतिवृष्टी आणि खंडित वीजपुरवठा या कारणाने ऑनलाईन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ता. 14 व 15 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज व उद्याच्या परिक्षामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात येईल असे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे यांनी सांगितले.
सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. अतिवृष्टीसदृशय पावसाने ठिकठिकाणी खंडित वीजपुरवठा व नेटवर्कच्या समस्या येत आहेत. या कारणाने बुधवार व गुरुवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहेत. याशिवाश शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीत दोन दिवासच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अंतिम वर्षाच्या पारंपरिव व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होत्या.
Solapur University postpones exams again! Online exam canceled due to natural calamity
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज