मंगळवेढा टाइम्स ऑनलाईन । कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. आज (सोमवारी) एटीकेटी व बॅगलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. Solapur University final exam
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेला सुरवात केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वैतागले आहेत. आता यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने परीक्षेचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
वालचंद कॉलेजमधील अक्षय राजेंद्र बंडगर व अक्षय संजय होटकर या विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचणींबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संपर्क साधला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पेपर देताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मनात आता भिती निर्माण झाली असून त्यांना नापास होईल की काय, असे वाटत आहे.
विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी ‘एमसीक्यू’चे 50 प्रश्न दिले असून त्यासाठी 90 मिनीटांचा वेळ दिला आहे. मात्र, विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अवघा 13 मिनिटांचाच वेळ असल्याचे दिसत आहे. उर्वरित वेळ तांत्रिक अडचणींमुळे buffring ध्ये गेल्याचे दिसत आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दिलेल्या हेल्पलाईनवरुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचेही विद्यार्थी सांगू लागले आहेत. दरम्यान, पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
पेपर सोडविताना येणाऱ्या अडचणी…
एका पेजवरील प्रश्न सोडवून दुसऱ्या पेजवर जाताना कृपया येथे क्लिक करा म्हणून पुन्हा आधीच्या पेजवर लिंक फॉरवर्ड होत आहे.
सुरुवातीचे काही वेळ लॉगिन करताना सर्व्हर डाउन; प्रश्न दर्शविताना पेज लोडवर जाते, तरीही परीक्षेचा वेळ कमी दाखवितो.
जे विद्यार्थी दोन विषयांची परीक्षा देत आहेत, त्यांना एक पेपर सबमिट झाल्यानंतर दुसऱ्या विषयाचा पेपर देताना मागील विषयाचा वेळ दाखवितो.
काही विद्यार्थ्यांचा परीक्षा सुरु होऊन साईट पूर्णपणे बंद झाली; त्यानंतर शून्य प्रश्न सबमिट केले म्हणून कम्प्लिटेड असा मेसेज येतोय 502 बॅड गेट-वे अशी त्रुटी वारंवार येत आहे;
एका पेपरसाठी 90 मिनिटांचा वेळ असतानाही अवघे मिळाले 16 मिनिटेच तांत्रिक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत अंतिम वर्षातील एटीकेटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली आहे.(सकाळ)
आज पहिला दिवस असून विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्याचा प्रयत्न युध्दपातळीवर सुरु असून विद्यार्थ्यांनी लॉगिन करुन ठेवावे. त्यांना वेळ वाढवून दिला जाईल.- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
Online mix of Solapur University final exam! The paper time was one and a half hours and 13 minutes
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज