टीम मंगळवेढा टाईम्स ।
यंदा परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांवर टिक मार्क करणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे.
भरारी पथकांच्या निदर्शनास आल्यानंतर जागीच पंचवीस विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत.
गुरुवारी जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पंधरा दिवसांत विद्यापीठाच्या चौकशी समितीसमोर विद्यार्थ्यांना हजार व्हावे लागेल. त्यानंतर समितीद्वारे विद्यार्थ्यांची चौकशी होईल.
यात विद्यार्थ्यांकडून जबाब घेतला जाणार आहे. गुरुवारी एकाच दिवसी पंचवीस जणांवर कारवाई झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरल्याची माहिती काही पालकांनी दिली.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये गोंधळ होत असल्याने विद्यार्थी काळजीत आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसी एक ते दीड तास प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्या.
त्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या नियोज गोंधळ उडाल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बुधवारी एमएस्सी तसेच एम.ए. कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनाही पंधरा ते वीस मिनिटे प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्या
. प्रशासनाच्या चुकांमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, असे पालकांनी सांगितले आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज