टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील भाग्य नगरातील श्रीकांत जनार्दन इंजामुरी यांच्या घरातून साड्या, शालू, पर्समधील रोकड व मोबाईल असा मुद्देमाल चोरट्याने शक्कल लढवून लंपास केला आहे.33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद इंजामुरी यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.
शुक्रवारी (ता. 9) पहाटे तीनच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. त्यावेळी बांबूला तारेचा आकडा टाकून कोणीतरी शिडीच्या साह्याने खिडकीत चढले.
त्यानंतर खिडकीत हात घालून बेडरूममधील भिंतीला अडकवलेली पॅन्ट ओढून घेतली. पॅन्टमधील पैसे तर फरशीवरील बॅग ओढून त्यातील मोबाईल चोरला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री.पवार करीत आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे घरफोडी
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून ५७ हजार ५०० रुपयाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री एक ते पहाटे ४.३० दरम्यान घडली.
याबाबतची फिर्याद बाळू शिवाजी स्वामी यांनी दिली असून त्याच्या राहत्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाट उघडून तिथे असलेल्या चावीने आतील कप्पा उघडून त्यात ठेवलेले बोरमाळ , पैंजण , सर , रोख रक्कम दहा हजार रुपये असा ५७५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याच दिवशी गावातील सचिन ऐवळे यांच्या पानटपरीत तर सुमन खडतरे याच्या घरी देखील चोरी केली.
बेशिस्त वाहनचालकांनाकडून पोलिसांनी वसूल केला 8 लाख 99 हजारांचा दंड
सोलापूर शहरातील बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने शहर पोलिसांनी सात पोलिस ठाण्याअंतर्गत कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
त्यानुसार 17 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर या काळात बेशिस्त वाहनचालकांसह विनामास्क फिरणाऱ्यांकडून आठ लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलिसांनी सुमारे नऊ हजार व्यक्तींविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्यावरून विवाहितेचा छळ
बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्यांनी छळ केल्याची फिर्याद संजीवनी साईनाथ जगताप यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. तत्पूर्वी, पतीचे पहिले लग्न झाल्याची माहिती लपवून सासरच्यांनी विवाह लावला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
माहेरून पैसे आणण्यावरून मानसिक, शारीरिक त्रास देत उपाशीपोटी ठेवले. शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी साईनाथ विजय जगताप, मालती विजय जगताप, विजय किसन जगताप, नीलेश विजय जगताप (सर्वजण रा. गजानन नगर, सहारा नगराजवळ, मजरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूळ मालकाच्या परस्पर विकली वाहने
जुळे सोलापुरातील शिवरत्न नगरातील ओंकार दत्तात्रय ढेकळे यांनी दोन वाहने (एमएच- 13, सीटी- 3344 आणि एमएच- 13, डीएच- 3344) घेतली होती. त्यानंतर ओळखीच्या मदार पैगंबर शेख (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) याला चालू स्थितीत फायनान्सचे हप्ते फेडल्यानंतर त्यांच्याकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र घेण्याचे ठरले. त्यानंतर दोन्ही वाहने शेख याने विकत घ्यायचे ठरले. त्याबाबत नोटरी करण्यात आली.
मात्र, चालविण्यासाठी घेतलेली दोन्ही वाहने परस्पर विक्री करून 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद ढेकळे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे.
चारचाकीची मालट्रकला धडक
येथील धोत्रीकर वस्तीसमोर जुना तुळजापूर नाका ते मार्केट यार्ड रोडवर मालट्रक (एमएच- 18, एए- 6156) थांबली होती. ट्रकचालक शैलेश महेंद्र बेंदे हा पत्ता विचारत असताना पुण्याकडून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या कारने (एमएच- 12, डीई- 4044) मालट्रकला मागून धडक दिली. त्या कारमधील ऋषीकेश वीरसंगप्पा कुपस्ता (रा. बिबेवाडी, पुणे) याच्या मृत्यूस कारचालक कारणीभूत ठरला.
स्वत:ही जखमी झाला आणि कारच्या नुकसानीस कारणीभूत ठरला, अशी फिर्याद पोलिस शिपाई विशाल सर्वगोड यांनी जोडभावी पोलिसांत दिली. या प्रकरणी सचिन उत्तमराव बाबर (रा. धनकवडी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सकाळ)
New face of thieves in Solapur! Theft from the window with the help of bamboo
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज