टीम मंगळवेढा टाईम्स ।
बनावट आधारकार्ड बनवून खोट्या व्यक्तीला उभा करुन तिघांनी जागा हडप केली अशी फिर्याद मोहम्मद सादिक हुसेन हवालदार (रा . गोविंद विलासमोर , गुलमोहर कॉलनी , पुणे) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.
याप्रकरणी सगीरा अकबरअली पिरजादे (बहिण), रियाज अकबरअली पिरजादे (भाचा),रईसा अल्ताफ हुसेन पिरजादे (बहिण), रिजवान अल्ताफहुसेन पिरजादे (भाचा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
परस्पर प्लॉट विक्रीप्रकरणी आणखी एक गुन्हा हवालदार हे कामानिमित्त पुण्यात राहतात. त्यांनी सोलापुरातील त्यांच्या दोन बहिणींना त्यांची जागा राहण्यासाठी दिली. मात्र, त्यांनी विश्वास संपादन करुन चक्क सख्या भावालाच टोपी घातली.
परस्पर प्लॉटची विक्री गुन्हा दाखल
प्लॉट विक्रीचा कोणताही अधिकार नसतानाही सायण्णा राम राव शागालोलू याने रेश्मा रविकांत कांबळे यांना प्लॉट विकला. त्यानंतर कांबळे यांनी राजेंद्र श्रावण जोगदंड आणि विक्रांत जोगदंड यांना प्लॉटची विक्री केली.
त्यामुळे सायण्णाने अजय मच्छिंद्र मस्के व सुनिल होगाडे यांची फसवणूक केली. तर राजेंद्र व विक्रांत जोगदंड यांनी आता त्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेतला आहे.
तत्पूर्वी , या जागेवर बांधकाम न करण्यासंदर्भात न्यायालयाने स्टे दिला आहे.तरीही बांधकाम करण्यात आल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची फिर्याद मस्के यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. आता सहायक पोलिस निरीक्षक कोल्हाळ हे पुढील तपास करीत आहेत.
सोलापुर जिल्ह्यातील तापमानात वाढ उन्हाळा जाणवू लागला
सोलापुर जिल्ह्याती आता उन्हाळा जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांच्या कमाल तापमानाच्या तुलनेत तापमान एक अंशाने उतरले असले तरी उन्हाचे चटके जाणवत होते. शिवाय उकाडाही आता वाढू लागलेला आहे.
फेब्रुवारी महिन्यातील काही दिवसांचा अपवाद वगळता दररोज तापमानात वाढ होत आहे. १८ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान हे ३२.४ इतके होते.
तर १९ फेब्रुवारी रोजी तापमान ३० अंश सेल्सिअस होते. २० फेब्रुवारीपासून तापमानात दररोज एक अंश सेल्सिअसने वाढ होत आहे. २५ फेब्रुवारी रोजी दोन अंश सेल्सिअसनी तापमानात वाढ झाली.
उन्हाची काहिली वाढत असल्यामुळे अडगळीत ठेवलेले कूलर, पंखे पुन्हा बाहेर काढण्यात येत आहेत. बंद असलेले कूलर आणि फॅन हे दुरुस्तीसाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात दाखल झाल्याचे दिसत आहे.
तसेच नवे कूलर, पंखे व एसी घेण्यासाठी नागरिक इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जात आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज