टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पोलीस व महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
यासाठी 27 हजार कर्मचाऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांनी दिली.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात लसीकरणाची मोहीम यशस्वी ठरली.
पहिल्या टप्प्यातील प्रतिसादानुसार आता लसीकरणाची दुसरी मोहीम हाती घेण्यात येत आहे. दुसऱया टप्प्यात आता महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे लसही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱया टप्प्यात ऑनलाइन नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लसीकरण करण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला अर्धा तास वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील किरकोळ घटना वगळता मोहीम यशस्वी झाल्यामुळे दुसऱया टप्प्यातील लसीकरणास कर्मचाऱयांची मागणी वाढत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज