बाळासाहेब झिंजुरटे । सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला. सांगोला तालुक्यातील चोपडी येथे वीज पडून महिलेचा तर हंगिरगे येथे तरुण ठार झाला. याशिवाय मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे वाकी-घेरडी येथे चार शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे.
मंगळवेढा,उत्तर , दक्षिण सोलापूर , मोहोळ , बार्शी या तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसात वीज पडून चोपडी येथील शकुंतला बाबुराव खळगे ( वय ५५ ) तर हंगिरगे येथील शुभम शहाजी साबळे ( वय २३ ) या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच वाकी-घेरडी येथील गणपत महादेव माळी यांच्या ४ शेळ्या दगावल्या.
सध्या ऑक्टोबर हीटमुळे सर्वत्र त्यांच्या उष्णता निर्माण झाली आहे. शेतकरी मुली वाफसा आल्यामुळे रब्बीच्या पेरणीत व्यस्त आहेत. असे असताना शनिवारी दुपारी अचानक मेघ दाटून येताच विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतातून पाणी वाहिले. शकुंतला खळगे या डाळिंब बागेतील गवत काढण्यासाठी गेल्या असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने झाडाखाली थांबल्या होत्या.
यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली , उपचारापूर्वीच त्या मयत झाल्या. त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , दरम्यान मुली , सून व नातवंडे असा परिवार जवळील आहे.
हंगिरगे येथील शुभम शहाजी साबळे हा तरुण दुचाकीवरून गॅस आणण्यासाठी घेरडीकडे येत होता. दरम्यान , पावसामुळे बिचुकले वस्ती जवळील जांभळीच्या झाडाखाली थांबला. यावेळी अचानक त्याच्या अंगावर वीज पडल्याने तो पाठीमागे ओढ्याच्या वाहत्या पाण्यात पडला, ही घटना ट्रॅक्टर चालकाने पाहून हंगिरगे ग्रामस्थांना सांगितली.
दरम्यान , वडील शहाजी साबळे , चुलते सुभाष साबळे , वैभव ढोले , सुरेश चौगुले , आबा मोटे , बंडू साबळे या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव संततधार घेऊन ओढ्यातील पाण्यात त्याचा शोध घेतला असता तो अर्धा कि.मी. अंतरावर मृतावस्थेत मिळून आला.
या घटनेची सांगोला पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. मोडनिंब व परिसरात शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले. या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरण्या केलेल्या आहेत व जे पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त आहे.
वीज पडून मरण पावलेल्या व्यक्ती व शेळीचा पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार डॉ.योगेश खरमाटे यांनी मंडल अधिकारी , तलाठी यांना दिले आहेत.
हस्त नक्षत्र कोरडे, चित्रा नक्षत्राला पिकांतील सऱ्या भरुन वाहिल्या.
चित्रा नक्षत्राच्या पावसामुळे कामती ( ता . मोहोळ ) परिसरातील अनेक गावांतील पिकांमधील सय भरून वाहिल्याचे चित्र शनिवारी दुपारी पाहायला मिळाले.
कामती बु.परिसरातील वाघोली , सोहाळे , बेगमपूर या भागात गेल्या अनेक दिवसांपासून उकाडा जाणवत होता. हस्त नक्षत्रात उन्हाची तीव्रता वाढलेली होती. शिवाय रब्बी हंगामात पेरलेल्या बियांना ऊब मिळून चांगली उगवण होते ,असे शेतकरी सांगतात. त्यात शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने पेरणी झालेल्या भागातील पिकांना पोषक असाच पाऊस आहे.
Solapur sangola Goat killed by lightning in Waki, rabbi crops relieved
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज