टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 216 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आज कोरोना चाचणीचे तीन हजार 496 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 हजार 280 अहवाल निगेटिव्ह आले असून 216 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
एकाच दिवशी 104 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 34 हजार 766 झाली आहे. त्यापैकी 32 हजार 78 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
रुग्णालयात सध्या 1 हजार 666 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 हजार 22 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.कोरोना चाचणीचे अद्यापही 45 अहवाल प्रलंबित आहेत.
ग्रामीण भागात सध्या 11 हजार 610 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये 2 हजार 623 जण आहेत.
आज ‘या’ भागातील रुग्णांचे मृत्यू
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील 68 वर्षीय पुरुष, बार्शी मधील सावळे गल्ली येथील 50 वर्षीय महिला, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 65 वर्षिय पुरुष व 60 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज