टीम मंगळवेढा टाईम्स ।
हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे सोलापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात दिली होती.
त्यानंतर देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे.
भाजपा सोलापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष या पदाचा श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्यानं हा राजीनामा मी स्वीकारला आहे. pic.twitter.com/KqnUuGFPBK
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 12, 2022
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे.
देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे.
हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित देशमुख यांनी त्या महिलेवर हनीट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.(स्रोत:सरकारनामा)
देशमुखांनी तक्रारीत काय म्हटले होते?
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका महिला मुंबईत घर आणि दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी ओशिवार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.
पैसे दिले नाही तर राजकीय आणि सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकीही दिली होती. त्या तक्रारीनुसार महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज