सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 140 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे तर सहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आज 2 हजार 246 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 106 अहवाल निगेटिव्ह आले असून 140 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आजच्या अहवालानूसार एकाच दिवशी 175 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 30 हजार 241 झाली आहे.
आजपर्यंत 901 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 2 हजार 841 जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत ग्रामीण भागातील 26 हजार 499 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आज ‘या’ गावातील 6 जणांचा मृत्यू
मोहोळ तालुक्यातील टाकळी येथील पन्नास वर्षिय पुरुष, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, करमाळा तालुक्यातील पांडे येथील 55 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील 42 वर्षिय पुरुष,
तर पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील 77 वर्षिय पुरुष आणि मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे अद्यापही 39 अहवाल प्रलंबित आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज