सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज आज 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सात पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे.तर सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील 24 वर्षाची महिला कोरोनाने मृत्यू झाला आहे. Solapur rural 93 positive today 327 Corona-free, 24-year-old girl dies
आज आलेल्या अहवालानुसार एक हजार 613 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 93 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोनाबाधितांची संख्या पहिल्यांदाच शंभरीच्या खाली आली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 127 एवढी झाली आहे तर 842 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्त झाल्याने 3 हजार 322 जण अद्यापही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुक्त झाल्यामुळे 24 हजार 963 जणांना घरी सोडले आहे.
आज ‘या’ गावातील नऊ जणांचा मृत्यू
सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील 24 वर्षाची महिला, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील 80 वर्षाचे पुरुष,नाईकवाडे प्लॉट बार्शी येथील 65 वर्षाचे पुरुष, तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष, जाधववाडी (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष,
तर पंढरपूर शहरातील शेटे पेट्रोल पंपाजवळ येथील 35 वर्षाची महिला, शेळगाव आर (ता.बार्शी) येथील 65 वर्षाचे पुरुष, वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 71 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Solapur rural 93 positive today 327 Corona-free, 24-year-old girl dies
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज