टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 266 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.तर अक्कलकोट तालुक्यातील समर्थनगर येथील 22 वर्षिय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आज कोरोना चाचणीचे 2 हजार 460 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 194 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या आता 26 हजार 940 झाली आहे. त्यापैकी 21 हजार 145 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 5 हजार 54 जणांवर उपचार सुरू आहेत. 741 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोना चाचणीचे 86 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
आज ‘या’ गावातील 11 जणांचा मृत्यू
अक्कलकोट तालुक्यातील समर्थनगर येथील 22 वर्षिय पुरुष, मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील 58 वर्षिय पुरुष,मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील 86 वर्षिय पुरुष,माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील 75 वर्षिय पुरुष,
तर मोहोळ तालुक्यातील मिरी येथील 46 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील 25 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील 62 वर्षिय पुरुष, माढा तालुक्यातील शेडशिंगे येथील तीस वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील 63 वर्षिय पुरुष, मोहोळमधिल अनगर येथील 85 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील 65 वर्षीय महिला यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
Solapur rural 266 corona positive again; Victim of a 22-year-old youth
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज