टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना जवळपास प्रत्येक गावात खेड्यात एन्ट्री केली आहे.आज 246 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.तर कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे.त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील 22 वर्षाच्या महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे आज रुग्णालयातून विक्रमी लोकांना घरी सोडण्यात आले. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून आज जवळपास 1 हजार 128 एवढ्या लोकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज 1 हजार 721 जणांची तपासणी करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 475 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 246 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 246 जणांमध्ये 146 पुरुष तर 100 महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 26 हजार 49 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 707 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.
कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही पाच हजार 193 जण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 20 हजार 149 जण घरी सुखरूप पोहोचले आहेत.
आज ‘या’ गावातील आठ जणांचा मृत्यू
सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील 22 वर्षाची महिला,कामती खुर्द हराळवाडी (ता. मोहोळ) येथील 56 वर्षाचे पुरुष, पेनूर (ता. मोहोळ) येथील 34 वर्षाचे पुरुष,
तर पंढरपूर समतानगर येथील 62 वर्षाचे पुरुष, बक्षी हिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) येथील 84 वर्षाचे पुरुष, खंदकरोड करमाळा येथील 74 वर्षाचे पुरुष, पांडे (ता. करमाळा) येथील 72 वर्षाचे पुरुष तर भक्ती मार्ग पंढरपूर येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू
सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना चाचण्यांची संख्या प्रचंड घटली आहे. आज 194 अहवाल निगेटिव्ह आले असून 50 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील बाधितांची एकूण संख्या आठ हजार 611 झाली आहे.
आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये लिमयेवाडी येथील मधुबन सोसायटी, मजरेवाडी येथील आयोध्या नगर, म्हाडा हाऊसिंग सोसायटीतील सुयोग नगर, बाळे येथील तोडकर वस्ती, शेळगी येथील वर्धमान नगर, शाहीर वस्ती, मुरारजी पेठ येथील गोल्डन गेट आपार्टमेंट, एसटी कॉलनी येथील साईनाथ अपार्टमेंट,
तर बाळे येथील लक्ष्मीनगर, कुचन प्रशाले जवळ, विडी घरकुलचा ए ग्रुप, मजरेवाडी येथील आनंद नगर, विजापूर रोड वरील रामलिंग सोसायटी, क्षत्रिय गल्ली, मुरारजी पेठेतील अभिषेक नगर, बाळे, देगाव येथील वानकरनगर, लक्ष्मी पेठ येथील विद्युत हौसिंग सोसायटी, देगाव येथील नाथ नगर, जुना पुना नाका येथील अभिषेक नगर, वर्धमान हाइट्स, अक्कलकोट रोडवरील पडगंची नगर, मुरारजी पेठ, नवीपेठ,
तर बाळे येथील दुमणे नगर, दक्षिण सदर बझार, विजापूर रोडवरील बंजारा हौसिंग सोसायटी, सैफुल, विजापूर रोडवरील रामलिंग नगर, अंत्रोळीकर नगर, गंगाधर हाउसिंग सोसायटी, जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क जवळ, गुरुनानक चौकातील नवजीवन हाउसिंग सोसायटी, बालाजी नगर, कुमठे गाव, पश्चिम मंगळवार पेठ, फॉरेस्ट, अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर, लष्कर मधील सागर आपार्टमेंट या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
In the rural areas of Solapur, 1128 people were released on the same day; The victim was a 22-year-old girl
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज