टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा लक्षात घेता, पोलीस भरती संदर्भातील जाहिरात रविवारी प्रसिद्ध झाली आहे.
सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० या दलात पोलिसांची जवळपास २५८ पदे भरण्यात येणार आहेत. या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, रविवारी सर्व माध्यमांमध्ये सोलापूर शहर , सोलापूर ग्रामीण व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० यांच्या कार्यालयाकडून रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल.
याशिवाय कार्यालयाने निश्चित केलेल्या शारीरिक व लेखी परीक्षेच्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात. परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासगीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत असेही नमूद केले आहे.
लेखी परीक्षा एकाच दिवशी …..
■ पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई व पोलीस चालक पदासाठी प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षेत ४० टक्के गुण अपेक्षित
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमदेवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमदेवारांची १०० गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेत ४० टक्के पेक्षा कमी गुण मिळणारे उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत.
अशी जाहीर होईल अंतिम गुणवत्ता यादी …
■ शारीरीक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची करण्या येईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मुळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील.
कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर गृहविभागाच्यावतीने अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले आहे.(स्रोत:लोकमत)
सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या
पोलीस शिपाई, चालक पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या रिक्त जागेसंदर्भातील सविस्तर माहिती , अटी , नियम व अन्य माहितीसाठी policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एवढ्या आहेत रिक्त जागा
सोलापूर शहर चालक ७३ ,पोलीस शिपाई ९८, सोलापूर ग्रामीण चालक २८, पोलीस शिपाई २६, राज्य राखीव पोलीस बल ३३.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज