मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुलीला मारहाण होत असताना सोडविण्यासाठी गेलेल्या सासूचे जावयाने ठोसा मारून दात पडल्याची घटना मुरारजी पेठ परिसरातील एन.जी. मिल चाळ येथे
सोमवार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. गौराबाई सिद्राम आहेरवाडीकर (वय ५५, रा.एन. जी. मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) असे दात पडून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
आहेरवाडीकर यांच्या घरात जावई कल्लप्पा भीमराव पाटील आणि गणपत भीमराव पाटील (दोघेही रा. दर्गनहळ्ळी, सोलापूर) हे दोघे आले होते.
घरगुती कारणावरुन जावई कल्लप्पा पाटील हा त्यांची मुलगी जयश्री हिला शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत होता.
यावेळी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गौराबाई यामध्ये पडल्या होत्या. यावेळी चिडून जावई आणि त्याचा भाऊ यांनी हाताची मूठ करून त्यांच्या तोंडावर बुक्की मारल्याने त्यांचा दात तुटून तोंडातून रक्त येऊ लागले.
तेथे पडलेले लाटणे घेऊन डाव्या हातावर व डोक्यावर मारून त्याला जखमी केले. तसेच पैसे घेऊन आल्याशिवाय घरी यायचं नाही अन्यथा जिवे मारण्याची धमकी पत्नीस दिली,
अशी फिर्याद गौराबाई आहेरवाडीकर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोना ढोबळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज