टीम मंगळवेढा टाईम्स । कमी दरात सोने देतो असे सांगून तिघांना बोलावून घेऊन चोरट्यांनी मारहाण करून २६ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे घडली आहे.
मल्लेश माने याने कमी दरात सोने देतो असे सांगितल्याने त्यांच्या सांगण्यावरून राहुल भवाळ ( वय २८, रा. काळेगाव , ता तुळजापूर, हल्ली रा. कसपटे, पुणे ) तसेच सतीश उगले, नागेश भवाळ, शंभू उकरंडे, विष्णू भवाळ, संतोष सूर्यवंशी असे सर्व मिळून अंत्रोळी शिवारात कार ( एमएच १४ एच.जी ३९४६ ) मधून गुरुवारी सायंकाळी आले होते.
यावेळी संतोष सूर्यवंशी व विष्णू भवाळ यांना रस्त्याच्याकडेला थांबवून चौघेजण मल्लेश माने याच्याजवळ द्राक्षबागेत गेले.
तिथे मल्लेश माने व इतर आठजणांनी सोने देण्याचा बहाणा करून त्यांना तलवारीने मारहाण करून त्यांच्याजवळील ११ हजार १०० रुपये तसेच १५ हजारांचे एकूण तीन मोबाइल असा २६ हजारांचा मुद्देमाल काढून घेऊन तिथून पळ काढला आहे. या मारहाणीत नागेश भवाळ, शंभू उकरंडे , राहुल भवाळ हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.
याबाबत मल्लेश माने व इतर आठजणांविरुध्द मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur lure of cheap gold The three were robbed in Antroli
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज