टीम मंगळवेढा टाईम्स ।
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री आशिष अजय मिश्र याने आपल्या जीपखाली चिरडून ठार केलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
या कृत्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य देऊन उद्या सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा कडकडीत बंद असेल व या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ . धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा बंदचे आवाहन करताना काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे,
लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना ठार मारण्याची घटना ही जनरल डायरने केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी आहे.
या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबत इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला आहे,
भाजप सरकारच्या विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत. सोमवारच्या बंदमध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सहभागी होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज