mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सतर्क राहा! सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात; SP सातपुते यांनी केले ‘हे’ आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 28, 2022
in सोलापूर
सतर्क राहा! सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात; SP सातपुते यांनी केले ‘हे’ आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत आहे, अशी अफवा सोशल मीडियातून दूरवर पसरली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तशी कोणतीही नोंद नाही. तरीपण, शाळा आणि पालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा आहेत. बहुतेक शाळांमध्ये मुले स्वत:हूनच शाळेला जातात.

पण, मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवेनंतर काही पालकांनी मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे. पण, अफवा असली तरीदेखील पोलिसांनी शाळांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.

शाळेत आलेल्या मुलाला न्यायला कोणी अनोळखी व्यक्ती किंवा महिला आल्यास, संबंधित शाळांनी संबंधित पालकाला कॉल करून त्या व्यक्तीची खात्री करावी आणि मगच मुलाला त्याच्याकडे सोपवावे.

शाळा परिसरात संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

मुलांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्याशी योग्य संवाद साधा, मुलांना परिस्थिती समजावून सांगा की, अनोळखी व्यक्तीशी बोलू नको

अनोळखी व्यक्तीने चॉकलेट, खाऊ, मोबाईल किंवा व्हिडिओ गेम दिला तरी घेऊ नका, जर कोणी तुम्हाला हात लावला किंवा धरले तर आरडा-ओरडा करा, आजूबाजूच्या लोकांकडून मदत मागा, रस्त्याने चालताना पालकांचा हात सोडू नका, पुढे-मागे पळू नका

पालकांनी अशी घ्यावी काळजी

मुलांना परिस्थिती समजावताना त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेऊ नका; सतत सतर्क राहा

मुलांना गर्दीत नेले तर त्यांचा हात सोडू नका. त्यांचा स्पर्श होत राहील याची काळजी घ्यावी. पदर, शर्ट हातात द्या, काही आक्षेपार्ह हालचाल आढळल्यास ११२ या टोल फ्री नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवा

पोलिसांचे आवाहन

पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती तुम्ही पुढे फॉरवर्ड करू नका; व्हिडिओ, ऑडिओवर विश्वास ठेवू नका

पोलिसांनी सांगितल्याशिवाय नागरिकांनी कोणताही मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल करू नये

तुमच्या मोबाईलवर मुलांच्या अपहरणासंदर्भात काहीही आलं, संशयास्पद वाटलं तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधा

पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास ११२ वर संपर्क करावा. (स्रोत:सकाळ)

शाळा, पालकांनी घ्यावी खबरदारी

जिल्ह्यात मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याचे कोणतेही रेकॉर्ड पोलिसांत नाही. सोशल मीडियातून अफवा पसरविण्यात आली आहे. तरीपण, पालकांनी व शाळांनी सतर्कता बाळगावी. पालकांनीच मुलांना आणायला शाळेत जावे.

शाळांनीही पालकांऐवजी कोणी दुसरा अनोळखी मुलाला न्यायला आला, तर संबंधित मुलाच्या पालकांकडे खात्री करावी.- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मूल बेपत्ता

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
Next Post
नागरिकांनो! महिला हॉस्पिटल & मल्टीस्पेशालिटी येथे आजपासून मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन

किडनी संबंधित सर्व उपचार आता मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध; वेळीच लक्षणे ओळखा

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा