mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही लोकप्रतिनिधींकडून उपेक्षाच; राजकीय कुरघोड्यांचा मात्र उद्रेक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 26, 2021
in सोलापूर, राज्य
काय सांगता! स्मार्टफोनची स्क्रीन व नोटांवर कोरोनाचा विषाणू ‘एवढे’ दिवस जिवंत राहू शकतो

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आमदार-खासदारांनी मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या निधीतून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे लक्ष देण्याची गरज होती.

त्याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत राजकीय विरोध करण्याची एकही संधी मात्र सोडली नाही. कधी लसीवरून तर कधी इंजेक्शन वरुन कधी महागाई तर कधी राज्य सरकारच्या कोरोना रोखण्याच्या अपयशावर सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवत आंदोलने केली.

परंतु , मोजके आमदार वगळता एकाही आमदार, खासदाराने दुसऱ्या लाटेत वेळेत निधी दिला नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावावर आपले अपयश खपविण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी सोडला नाही , अशी चर्चा आहे.

सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदारही आहेत. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ ते ४५ लाखांपर्यंत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर अनेकजण रस्त्यावर आले. पहिली लाट ओसरतानाच आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आमदारांना मिळणाऱ्या दोन कोटींपैकी एक कोटीचा निधी कोविडसाठी खर्चास परवानगी दिली.

त्यानंतर सर्वच आमदारांनी तो निधी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी देणे अपेक्षित होते. मात्र , तसे काहीच झाले नाही. एप्रिलपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि शहराबरोबरच ग्रामीण भागाची रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत पोचली. तर साडेतीन हजार जणांचे कोरोनाने बळी घेतले.

पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही, पालकमंत्री बदला, पालकमंत्र्यांमुळेच सगळे घडले, अशी टीका करणाऱ्या बहुतेक आमदारांनीही त्यावेळी आपला आमदार निधीचा एक छदामही कोविडसाठी दिला नव्हता , हे विशेष. आता सर्वच आमदारांनी त्यांचा निधी कोविडसाठी देऊ केला असून ,निधीची पत्रे जिल्हा नियोजन कार्यालयाकडे पाठविली आहेत.

परंतु , कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी अथवा आल्यानंतर तत्काळ तो निधी देऊन उपाययोजना का केल्या नाहीत, राजकीय विरोधात जनतेचे हाल झाले, अनेकांना जीव गमवावा लागला , त्याला जबाबदार नेमका कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

खासदारांकडून छदामही नाही

केंद्र सरकारने कोरोना काळात तिजोरीची आर्थिक स्थिती बिघडल्याने दोन वर्षासाठी खासदार निधीला ब्रेक लावला. मात्र , यापूर्वी दिलेल्या निधीतील दोन-चार कोटींचा निधी दोन्ही खासदारांचा अजूनही शिल्लक असल्याची माहिती जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी दिली.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सोलापूरचे खासदार डॉ . जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कोरोना काळात अनेक ठिकाणी दौरे केले. अनेक आंदोलनात सहभाग नोंदविला, परंतु त्यांचा शिल्लक निधी कोरोनासाठी दिला नाही.

आता डॉ. महास्वामी यांनी निधी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसऱ्या खासदारांकडून निधी मिळाल्याचे एकही पत्र आम्हाला मिळाले नसल्याचेही जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना उद्रेकसोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
Next Post
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

महाविकास आघाडीतून 'हा' पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत?

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा