टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर शहरातील सर्वात मोठी पोलिस वसाहत म्हणून ओळख असलेल्या अरविंद धाम पोलिस वसाहतीत एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
काल मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतला. या घटनेने पोलिस वसाहतीत खळबळ उडाली आहे.
पृथ्वीराज गणपतसिंह चव्हाण (वय.16) असे नाव असून अज्ञात कारणाने गळफास घेतल्याची नोंद अरविंद धाम पोलिस वसाहतीत अज्ञात कारणानं गळफास घेतल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झालीय आहे. त्याने राहत्या घरी मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास सिलिंग फॅनला कपड्याच्या साहाय्याने गळफास घेतला होता.
नातेवाईकांना ही बाब समजताच ताबडतोब खाली उतरवून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. यावेळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.
मुलगा गेल्याने आई-वडिलांना जबर धक्काअल्पवयीन मुलाचे वडील हे सोलापूर पोलिस मुख्यालय येथे तैनात आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. आत्महत्या केलेला मुलगा हा थोरला होता. त्याने अचानकपणे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
शासकीय रुग्णालयात आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न त्याच्या आई-वडिलांना देखील पडला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज