टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषदेची प्रसारमाध्यमांसमोर शिक्षण विभागाने लाच मागण्यासह मानसिक छळ केल्याचा आरोप ग्लोबल रणजितसिंह डिसले गुरूजी यांनी केला होता.
या आरोपावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोटीसाद्वारे जाब विचारला होता. या नोटीसाचा खुलासा सादर केला असून, ‘साहेब, मला माफ करा’. मी अनावधनाने आरोप केल्याचा आशय खुलाशात दिसून आला आहे.
मात्र, ‘चुकीला माफी नाही’ असे म्हणत सीईओ स्वामी यांनी डिसले यांचा खुलासा फेटाळून लावला आहे.
डिसले गुरुजी हे गेल्या पाच वर्षांपासून परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गैरहजर असताना पगार काढला कसा? अशी जाब विचारणारी नोटीस प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकाला जारी केली आहे.
याबाबतची पार्श्वभूमी अशी की, डिसले गुरूजी यांच्या आरोपांवर सीईओ दिलीप स्वामी यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.
एका टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मानसिक त्रास दिला आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप गुरुजी डिसले यांनी केला होता.
या आरोपावर सीईओ स्वामी यांनी चौकशी करणार असल्याचे नोटीसाद्वारे जाब विचारला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेस भेट देणार होते.
या निमित्ताने गुरुजी डिसले आणि सीईओ यांच्याशी दोनवेळा संपर्क झाला. मात्र, संपर्कादरम्यान मानसिक त्रास अथवा लाचेची मागणी होत असल्याचे सीईओ यांच्या निर्दशनास आणले नसल्याचा ठपका नोटीस ठेवण्यात आला.
डिसले गुरुजी अध्ययन रजा मागण्यावरून चांगलेच चर्चेत आहेत. स्वत: ग्लोबल टीचर डिसले हे झेडपी शिक्षक असताना प्रशासनाला दिशाभूल करित कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.
परदेशात अध्ययनासाठी आवश्यक ती कागदपत्रे ग्लोबल गुरुजी डिसले यांच्याकडे उपलब्ध नसताना केवळ राजकीय नेते मंडळीचा आधार घेत अध्ययन रजेची मंजूरी घेतल्याचे बोलले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज