टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वसाधारण जागा भोसे गटात एकमेव सिध्देश्वर रणे यांना तिकीट मिळाले आहे.

भोसे जिल्हा परिषद गटात तुतारीचे उमेदवार सिध्देश्वर रणे यांनी मतदार संघातील मतदारांच्या भेटीगाठी गेल्या काही महिन्यांपूर्वीच सुरु केल्या होत्या.

सिध्देश्वर रणे हे भोसे गटातील प्रबळ दावेदार मानले जात असून सर्वसाधारण जागेवर योग्य उमेदवारी मिळाल्याने जनता देखील समाधानी असल्याने चित्र आहे.

सिद्धेश्वर रणे यांनी भोसे गटातील 16 गावातील प्रत्येक नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. घर टू घर प्रचार देखील त्यांनी सुरू केला आहे.

गेल्या तीन महिन्यापासून सतत मतदारांच्या व नागरिकांच्या संपर्कात असून रस्ते, आरोग्य ,पाणी यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्यामुळे त्यांनी यावर लवकरच ठोस उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे.

दक्षिण भागात रणे यांनी हुन्नुर गावात मोठ्या प्रमाणात सोलर प्रोजेक्ट सुरू केला आहे. येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रोजेक्ट सुरू करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण भागातील बेरोजगार तरुणांना आपल्या गावातच काम मिळावे यासाठी ते प्रयत्नशील असून मोठमोठ्या कंपन्या आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.

दक्षिण भागाच्या विकासासाठी ही निवडणूक लढवत असून येणाऱ्या पाच वर्षात विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जात आहेत. भोसे जिल्हा परिषद गट विकासाचे आयडॉल तयार करण्यासाठी त्यांनी मानस केला आहे.
भोसे, नंदेश्वर, हुन्नुर, मानेवाडी, रेवेवाडी, महमादाबाद, लोणार, पडोळकरवाडी या भागातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










