मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सिद्धेश्वर तात्या डोंगरे यांची मंगळवेढा येथील गट नंबर ३१२५/२/ब मधील उत्तर दिशेला असणारी जमीन बनावट, बोगस कागदपत्रे व नकाशे तयार करून फसवणूक केल्याबद्दल
अशोक भगवान कोळी (रा.मंगळवेढा) यांच्या विरोधात सिद्धेश्वर डोंगरे यांनी प्रांताधिकारी कार्यालय बाहेर दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
सदर गटात दि.२७ जानेवारी २०२२ रोजी भूमी अभिलेख अधिकारी यांची उपस्थिती नसताना देखील पोलीस बंदोबस्तात २० गुंठे क्षेत्रावरती मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन अतिक्रमण केले आहे.
त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, तहसीलदार कार्यालय मंगळवेढा, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही.
तरी सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि गट नंबर ३१२५/२/ब या गटातील अतिक्रमण काढून मिळावे यासाठी डोंगरे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज