टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राजकारण विरहित मराठा आरक्षण लढा उभारणार असल्याचे मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले.
आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, गेली कित्येक दिवस मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढत असलेले आरक्षणसुप्रीम कोर्टाने अखेर डावलले आणि केद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून आरक्षणाबाबत एकमेकावरती प्रत्यारोप होत आहेत.
राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण आरक्षणाच्या अंदोलनात सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी राजकारण विरहीत मराठा आरक्षणासाठी लढा उभा करावा लागेल.
छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना भेटून आरक्षाणासाठी केद्र सरकार व राज्य सरकार यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि पर्याय सांगितले आहेत.
३४२ अ माध्यमातून राज्यपालाकडे अहवाल सादर करणे असेल तसेच आरक्षणापूर्वी राज्य सरकारलाही काही पर्याय दिले आहेत. त्या अनुषंगाने यासाठी केद्र सरकार व राज्य सरकार दोघांना ही समान जबाबदार पकडून राजकारण विरहीत लढा उभा केला जाईल.
छत्रपती संभाजी महाराजानी ६ जून पर्यंत सारथी संस्था व आण्णासाहेब पाटील , जिल्हा मराठा वसतिगृह व नियुक्ताना आरक्षणद्या यासंदर्भात ज्या काही मागण्या मांडल्या आहेत.
त्यासंदर्भात काय निर्णय होतो हे पाहुन येत्या ६ जूनला रायगडावर छत्रपती संभाजी महाराज काय निर्णय घेतात , हे पाहून मंगळवेढ्यातील समस्त मराठा समाज एकत्रीत करून परत एकदा जोमाने हा राजकारण विरहीत लढा उभा केला जाईल असे आवताडे यांनी सांगितले.
शेवटी एकच ध्येय मराठा आरक्षण आणि यामध्ये जर कोणी अंतर्गत पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला समस्त समाजासमोर उघडा करून योग्य कारवाई केली जाईल अशा लोकांना मराठा आरक्षण लढ्यापासून बाजूला केले जाईल असे सिद्धेश्वर आवताडे म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज