टीम मंगळवेढा टाइम्स ।
आर्थिक क्षेत्राबरोबरच इतर सर्व क्षेत्राशी निगडित असलेल्या आणि बँकेच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या श्रीकृपा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने
मंगळवेढा तालुक्यातील विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त, शिक्षक, व गुणवंतांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राहुल जाधव यांनी दिली.
पंढरपूर रोडवरील हॉटेल सुगरण येथे आज दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आमदार समाधान आवताडे व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित बापू कदम यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त, शिक्षण व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून इतरांसमोर आदर्श उभा करत दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या गुणवंतांचा त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन म्हणून श्रीकृपा महिला अर्बनच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर अनेक गुणवंत रत्नांचा वेळोवेळी सन्मान केला असून वयाने ज्येष्ठ झाले तरी मनाने कायम चीरतरुण राहत विविध क्षेत्रांमध्ये आजही कार्यरत असणाऱ्या आणि सर्वांसाठी प्रेरक अशा व्यक्तींना या स्नेहसंवाद मेळाव्यामध्ये सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे हे असणार आहेत.
याप्रसंगी माजी सभापती प्रदीप खांडेकर, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ-जाधव,
सांगोला कृषी अधिकारी दिपाली जाधव-घाडगे, शिक्षक पतसंस्थेचे संस्थेचे चेअरमन विठ्ठल ताटे, शिक्षक नेते सुरेश पवार, शिक्षक संघाचे नेते संजय चेळेकर, सरचिटणीस भीमराव खडतरे आदि प्रमुख उपस्थित असणार आहेत.
आज होणाऱ्या सन्मान सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृपा महिला अर्बन बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज