टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयामध्ये एका वृद्धाने स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही माकपची माजी कार्यकर्ता होती.
त्यांचं नाव अल्लाउद्दीन शेख असं होतं. विशेष म्हणजे ते 80 वर्षांचे होते. त्यांनी अचानक नरसय्या आडम यांच्या कार्यालयात स्वत:ला का संपवलं? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
तसेच या वृत्तामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. शेख यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबतची माहिती तरी अद्याप समोर आलेली नाही. संबंधित घटना ही दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयामध्ये घडली आहे.
अल्लाउद्दीन शेख यांनी संबंधित कृत्य करण्याआधी माजी आमदार नरसय्या आडम यांची भेट घेतली. त्यानंतर कार्यालयात कोणी नसताना त्यांनी स्वत:ला संपवून घेतलं. संबंधित प्रकार समोर आला तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्ती हा आमचा कार्यकर्ता नाही. यापूर्वी ते माकपचे कार्यकर्ते होते. मात्र आता त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असं नरसय्या आडम यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयुष्यात असा टोकाचा निर्णय घेऊ नये
आयुष्य खूप सुंदर असतं. ते आपल्याला एकदाच मिळतं. त्यामुळे ते आपण जपायला हवं. आयुष्यातील सुंदर क्षण आपण जपायला हवेत. चांगल्या क्षणांची आठवण कायम मनात साठवून ठेवायला हवी. काहीवेळा अडचणी येतात. पण त्या अडचणींच्या काळात नैराश्यात न जाता त्यांचा सामना करता यायला हवा. अडचणींचा सामना करायलाच हवा.
कारण या अडचणींचा सामना केल्यानंतर जे यश आपल्याला मिळतं ते खूप मोठं असतं. त्यामुळे आपण समृद्ध होतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करुन पुढे चालत राहणं जास्त आवश्यक आहे.
काही जण नैराश्यात जावून स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात. पण तसं करणं योग्य नाही. याउलट आपण संघर्ष करायचा आणि यशस्वी व्हायचं. कारण यश येतं तेव्हा भरपूर आनंद घेऊन येतं.(स्रोत:tv9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज