mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हाताची नस कापली…; नंतर गळा चिरून डॉक्टरनं सपवलं जीवन, वळसंगकरांनंतर 12 दिवसांत सोलापुरात दुसरी घटना, पंधरा दिवसांपूर्वीच मिळालेली MBBSची पदवी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2025
in आरोग्य, क्राईम, सोलापूर
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सोलापूर शहर आधी प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं हादरलं होतं, त्यानंतर 12 दिवसांमध्येच शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आधी नस कापली त्यानंतर स्वतःचा गळा चिरून डॉक्टर आदित्य नांबियार (वय 24, रा. मुंबई) याने सोलापुरात आपल्या रूममध्ये आत्महत्या केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर 12 दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

आदित्यला 15 दिवसांपूर्वीच मिळालेली एमबीबीएसची पदवी

काल (मंगळवारी) सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. याने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 15 दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळवली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.

मंगळवारी वडिलांनी आदित्यला सकाळी फोन केला होता. पण त्याने फोन उचलला नाही. यामुळे त्यांनी आदित्यच्या मित्राला त्याला पाहण्यासाठी सांगितलं. मात्र, दरवाजा बंद असल्याने तो तोडून आत गेल्यावर आदित्य हा बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं दिसून आलं होतं. त्या ठिकाणी फक्त रक्तच दिसत होते.

घटनास्थळी काय-काय आढळलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन इंजेक्शन, सलाइन, मोबाइल, पाकीट, आदी वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य अबोल होता. तो बोलत नसल्याने आम्हाला त्याच्या तणावाविषयी किंवा इतर कोणत्याही कारणांची माहिती नव्हती. हे वृत्त ऐकून आम्हालाही धक्का बसल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितले.

शांत असलेल्या आदित्यने चाकूच्या साहाय्याने स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

डॉ. आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आदित्य सोलापूरच्या होटगी रोड परिसरात भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत त्याने आपलं जीवन संपवलं आहे.

रूममधील बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत डॉ. आदित्य याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर डॉक्टर आत्महत्या

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
Next Post
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

देशात जातनिहाय जनगणना होणार; मोदी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा