mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! अखेर संजय राऊत यांना ईडीकडून अटक; राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 1, 2022
in राज्य
Breaking! साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; आता पुढे काय?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दुपारी त्यांना अंमलबजावणी संचलनालय ताब्यात घेतलं होतं. रविवारी सकाळीच ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचलं होतं.

साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ईडी कार्यालयात घेऊन आले होते.

संजय राऊत यांना आता सोमवारी सकाळी जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

काल संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाल्याची देखील माहिती आहे. याआधी संजय राऊत यांना ED ने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावला होता.

मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यानंतर रविवारी सकाळी ED अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 8 तासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

ईडीकडून केले गेलेले आरोप खोटे असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही घाबरणार नाही. भाजप संजय राऊत यांना घाबरली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दुसरीकडे संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्ना पाटकर यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी हा एफआयआर दाखल केला.

स्वप्ना पाटकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती अशा प्रकारची लेखी तक्रार पोलिसांना दिली होती.

दोन रिव्हॉल्वर, बँकेत कोट्यावधींच्या FD, बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट, अलिबागमध्ये जमीनी; संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने(ED)अटक केली आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली.

तब्बल साडे तास तासांच्या चौकशी नंतर ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊंताना ताब्यात घेत हा हाय व्होल्टेज ड्रामा संपवला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई झाली आहे.

मात्र, या कारवाईच्या निमित्तामे पुन्हा एकदा संजय राऊतांची प्रॉपर्टी चर्चेत आली आहे. संजय राऊतांच्या नावे बँकेत कोट्यावधीच्या FD आहेत.

तर बायको आणि स्वत:च्या नावावर मुंबईत फ्लॅट तसेच अलिबागमध्ये जमीनी देखील आहेत. राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना राऊतांनी प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यामुळे आता संजय राऊत यांची एकूण मालमत्ता किती आणि ईडीने जप्त केलेली मालमत्ता किती? याचा हा आढावा.

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना संजय राऊतांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञा पत्राद्वारे जाहीर केली होती. 1 लाख 55 हजार 772 रूपयांची कॅश आणि बँकेत 1 कोटी 93 लाख 55 हजार 809 रूपये असल्याचे राऊतांनी प्रतिज्ञा पत्रात नमूद केले होते. तसेच आपल्या नावार एक वाहन असून ते 2004 मध्ये खरेदी केल्याचे राऊतांनी प्रतिज्ञा पत्रात लिहीले होते.

पत्नीकडे सोनं 729.30 ग्रॅम सोनं
पत्नी वर्षा यांच्याकडे 729.30 ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात असल्याचे संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद होते.

या सर्व दागिण्यांची किंमत 39 लाख 59 हजार 500 रूपये आहे. तर एक लाख 30 हजार रुपयये किंमतीचे 1820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दिगीने आहेत.

बँकेत 3 कोटी 38 लाखांची FD
संजय राऊत यांच्या नावावर बँकेत ठेवा अर्थात FD देखील आहेत. या FD 3 कोटी 38 लाख 77 हजार 666 असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते.

मालमत्तेसह संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात कमाई देखील नमूद केली होती. 2020-2021 या वर्षात संजय राऊतांनी 27 लाख 99 हजार 169 रूपये कमावले.

तर त्यांच्या पत्नी वर्षा यांची कमाई 21 लाख 58 हजार 790 इतकी दाखवण्यात आली आहे.
अलिबाग आणि पालघरमध्ये जमीनी, दादरमध्ये फ्लॅट आणि अवनेक व्यावसायीक अलिबागमध्ये संजय राऊतांच्या नावावर जमीनी आहेत.

तर पत्नी वर्षा यांच्या नावावर पालघरमध्ये जमीन आहे. संजय राऊत यांच्या नावे रायगडमध्ये नॉन अॅग्रीकल्चर जमीन देखील आहे. या जमिनीची किंमत साधारण 2.20 कोटी आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दादरमध्ये दोघांच्या नानावर एक एक फ्लॅट आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये राऊतांनी फ्लॅट घेवून ठेवले आहेत.

संजय राऊतांची 11 कोटी 15 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केलेय
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ईडीने अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने ही कारवाई केली होती. संजय राऊतांची एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे.

संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अटकसंजय राऊत

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
Next Post

अरे वा..! धनश्रीच्या दोन्ही संस्थेला 'इतक्या' कोटींचा नफा, एक हजार कोटीचा टप्पा केला पार; सभासदांना लाभांशही केला जाहीर

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा