mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिवसेना काँग्रेसचा डाव उधळणार; ‘या’ तालुक्यात दुसरे मंगळवेढा घडणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2022
in राजकारण, राज्य
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पक्षनेतृत्वाचे आदेश नाराजीनेच मानून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षिरसागर यांनी माघार घेतली आहे.

मात्र, कॉँग्रेसचा या ठिकाणी पुन्हा निवडून येण्याचा डाव शिवसेनेमुळेच उधळणार आणि कोल्हापूर उत्तरमध्ये मंगळवेढा घडणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तरची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेसने या जागेवरुन दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना रिंगणात उतरविले आहे.

भाजपने ही निवडणूक अतिशय ताकदीने लढवण्याचे ठरवत माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना मैदानात उतरविले आहे.

काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात दुरंगी लढत होत असली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

उमेदवार कुणीही असो, लढाई मात्र दोन पाटलांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सत्यजीत कदम हे खासदार धनंजय महाडिक यांचे निकटवर्तीय असल्याने या निवडणुकीला सतेज पाटील- धनंजय महाडिक अशा संघर्षाचीही किनार आहे.

महाविकास आघाडीने त्यांच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही जागा काँग्रेसला दिली. यावरूनदेखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना लाचार आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.

2019 नंतर जागांवर पोटनिवडणूक झाल्या. ज्या कोल्हापूरात 7 पैकी 5 वेळा शिवसेनेचा आमदार झाला आणि दोनदा काँग्रेसचा आमदार झाला. जर हीच जागा तुम्ही काँग्रेससाठी सोडत असला तर तुम्ही लाचार झालेले आहात, अस दिसून येत आहे.

शिवसेनेचे कार्यकतेर्देखील आता हवालदिल झालेले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. २०१९ मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या विजयात कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठींब्यामुळेच जाधवांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना धूळ चारली होती.

मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी क्षीरसागर पोटनिवडणुक लढविण्याच्या तयारीत होते. मात्र, पक्षनेतृत्वाने ही जागा कॉँग्रेसला सोडली. त्यानंतर राजेश क्षीरसागर नाराज झाले होते.

काही दिवस ते आऊट ऑफ रिचही होते. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी कॉंग्रेसला भोवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यास सभेत दगडफेक झाल्याने वातावरण फिरल्याचेही काही जण बोलत आहे. मुक्तसैनिक वसाहत येथे सभेत अज्ञातांतकडून दगडफेक करण्यात आल्याचा दावा वाघ यांनी केला होता.

यावेळी वाघ यांनी ट्विट करत, ‘वा रे बहादुरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे मारता का? ‘तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा. असल्या थेऱ्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही.

भाजपाचा नियोजनबध्दपणे जोरदार प्रचार सुरू असताना कॉँग्रेसला मुख्य चिंता ही शिवसेनेच्या नाराजीची आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. ज्यांनी सेनेचे ५ आमदार पाडले, त्यांच्यासाठी जागा सोडणं हे मनाला लागलं.

निवडणूकीत पराभवानंतर डगमगलो नाही. मात्र उत्तर कोल्हापुरची जागा कॉंग्रेससाठी सोडणं याचं दु:ख वाटतंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या मेळाव्यालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे कॉँग्रेसचा डाव शिवसेनाच उधळणार अशी चर्चा सुरू आहे.(स्रोत:The Focus India)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवसेना

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
Next Post
सकारात्मक प्रतिसाद! पंढरपूर-विजापूर रेल्वे मार्ग लवकरच सुकर होण्याची चिन्हे; आ.आवताडे यांचे विशेष प्रयत्न

पंढरपूर-मंगळवेढा-विजयपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी आ.समाधान आवताडे दिल्लीत; रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंनी दिले 'हे' आश्वासन

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा