टीम मंगळवेढा टाईम्स ।
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढा आयोजित महाराष्ट्रातील पहिले शिवार नाट्य संमेलन हे संत भूमी मंगळवेढा नगरीत आज होणार आहे.
शिवार नाट्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मंगळवेढाच्या वतीने, नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्या प्रा.तेजस्विनी सुजित कदम व मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम, नाट्य संमेलन प्रमुख अ भा मार्गदर्शक अँड. सुजित कदम,
अखिल भारतीय नाट्य मराठी नाटय परिषद मुंबई नियामक मंडळाचे माजी सदस्य यतीराज वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सभासदांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष सिनेअभिनेते अजय तपकिरे आहेत.
या कार्यक्रमासाठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. या नाट्य शिवार संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता दामाजी चौकातून नाट्य दिंडीने होणार आहे. सकाळी १०.०० पासून सप्तशृंगी मंगल कार्यालय धर्मगाव रोड या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यामध्ये पथनाट्य, लघुनाटिका एकपात्री सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सादरीकरण करण्यात आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषद मुंबईच्या आठ शाखा यामध्ये नाट्य परिषद शाखा मंगळवेढा, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, उस्मानाबाद, अकलूज, सांगोला, आदी शाखांतील मान्यवर व कलाकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
तरी सदर शिवार नाट्य संमेलनास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई नियामक मंडळ सदस्या तथा संमेलन स्वागताध्यक्षा प्रा.तेजस्विनी कदम यांनी नाट्य परिषद शाखा मंगळवेढाच्या वतीने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज