mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात शेतकरी सन्मान योजनेत बनवेगिरी; लाभार्थ्यांनी कारवाई टाळण्यासाठी भरले स्वतःहून पैसे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 21, 2020
in क्राईम, मंगळवेढा
शेतकऱ्यांना दिलासा! मंगळवेढा तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील ८१ गावात १ हजार ५४१ अपात्र लाभार्थी आढळून आले होते .अपात्र असताना योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून त्या रक्कमेची वसुली करण्यात येत आहे.

दरम्यान आजपर्यंत तब्बल २५ लाख रुपये पर्यत रक्कम वसुली करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेक लाभार्थ्यानी स्वतःहुन तलाठयाकडे जाऊन व जाहीर केलेल्या स्टेट बँकेच्या खात्यात रक्कम भरली आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतात.

ठराविक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जाहीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी अपात्र असतानाही नोंदणी केली.

विशेष म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले. तालुक्यात १ हजार ५४१ अपात्र लाभार्थी आहेत. त्यांना हे पैसे भरण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये शासनाला परत करायचे पैसे भरले भरावे असे तहसीलदार स्वप्निल रावडे याच्याकडून आवाहन करण्यात आले होते.

या योजनेच्या निकषानुसार जर शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण संबंधित शेतकरी त्याचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करत असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही. जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर तोही या योजनेसाठी अपात्र ठरणार.

जर संबंधित शेतकरी करदाता असेल तर तोही यासाठी अपात्र ठरणार आहे. प्रत्यक्षात या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेकांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे पडताळणीत आढळून आले होते.

तालुक्यातील ४० हजार ७१ लाभार्थ्यांमध्ये १ हजार ५४१ अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांत भरण्यात आलेल्या रक्कमेपैकी आजपर्यंत २५ लाख पर्यत रक्कम वसूल झाली आहे.

कारवाई च्या भीतीपोटी स्वतः हुन मिळालेली रक्कम अपात्र लाभार्थी बँक खात्यात भरत आसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
Next Post
कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्र ऋषीकेश जोंधळे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद

धक्कादायक! महाराष्ट्राचा सुपुत्र संग्राम पाटील यांना वीरमरण; जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये घटना

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..