मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
एका खुनासह फसवणूक, दरोडयातील पाहिजे असलेला आरोपी शेखर जाफर पवार याला सिध्दापूर येथुन बोराळे गावाकडे मोटार सायकल वरुन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
शेखर जाफर पवार (रा.सिध्दापूर ता.मंगळवेढा) हा एक खुनासह दरोडा व दोन दरोडयामधील आरोपी असून मागील 15 वर्षा पासुन अस्तित्व लपवुन फिरत होता.
सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पाहिजे आरोपी पकडण्याकरीता शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सुरेश निबांळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचने प्रमाणे सुरेश निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शाखेकडील पथक प्रमुख व त्यांचा पथकास पाहिजे आरोपीस जेरबंद करणेबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमादाडे व त्यांचे पथक मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत बोराळे येथे आले असता, गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, दरोडयातील पाहिजे आरोपी हा सिध्दापूर येथुन बोराळे गावाकडे त्याची काळे रंगाची हिरो होंडा शाईन मोटार सायकल वरुन येणार आहे.
सदर बातमी प्रमाणे पोउपनि/ जमदाडे व त्यांचे पथकाने सिध्दापूर ते बोराळे जाणा-या रस्त्यावर सापळा रचुन पाहिजे आरोपीत यास ताब्यात घेतले. सोलापूर जिल्हयातील पाहिजे आरोपीचे अभिलेख पडताळणी करता सदर आरोपीत हा खालील गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन झाले.
1)मंगळवेढा पोलीस ठाणे गुरंन 162/2013 भादंवि क. 395, 397, 420, 120ब, 2) मंगळवेढा पोलीस ठाणे गुरंन 97/2010, भादंवि क. 398, 402. 3) मंगळेवढा पोलीस ठाणे गुरनं 161/2009 भादंकिव क. 326, 323, 504, 506. 4) मंद्रुप पोलीस ठाणे गुरनं 33/2007 भादंवि कं. 396, 397.
सदर आरोपीतास पुढील कारवाई करीता मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास मंगळवेढा पोलीस करीत आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचे विरुध्द खुनासह दरोडा, दरोडा, फसवणुक सारखे वरील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नमुद गुन्हयामध्ये अटक टाळण्यासाठी आरोपी हा मागील 15 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत असे.
सदर उल्लेखनीय कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व हिम्मत जाधव, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे नेत्तृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, सहाफौज/घोळवे, पोहवा/परशुराम शिंदे, मपोना/पल्लवी इंगळे, पोकॉ/अजय वाघमारे, अन्वर अत्तार, यश देवकते, सुरज रामगुडे, मपोकॉ/झळके, चापोहवा/प्रमोद माने, यांनी केली आहे.
मंगळवेढ्यात मंद्रूप मधील गुन्हे उघडकीस
अधिकची कसून चौकशी केली असता त्याने केलेले गुन्हे कबूल केले शिवाय अभिलेख पडताळणी तपासणी केली असता पाहिजे आरोपी यादीतील हा आरोपी असल्याचे समोर आले.
संबंधित आरोपीवर मंगळवेढ्यातील तीन तर मंद्रुप येथे एक गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीस मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज