टीम मंगळवेढा टाईम्स ।
गरजू व गरिबांना परवडेल अशा दरात
रुग्ण सेवा देत असलेले शिर्के हॉस्पिटलचे संचालक डॉ.शरद वसंत शिर्के यांनी आपल्या 52 व्या वाढदिवसा दिवशी एक निश्चय केला आहे. मंगळवेढा शहरात एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.शरद शिर्के यांना कॉलेज जीवनापासूनच समाजसेवेची आवड होती. त्यांनी आयुष्यात गरजू व गरीब रुग्णांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
जी दिली गेली दानत, तीची आज दुवा झाली, जगतो मित्रहो धुंदीत तीच आज दवा झाली या कवी शिवाजी सातपुते यांच्या कवितेचे बोल डॉ.शरद शिर्केसाठी बरेच काही सांगून जातात.
डॉ.शरद शिर्के हे अत्यंत गरीब परस्थितीतुन त्यांनी विश्व निर्माण केले आहे. त्या गरिबीची जाणीव म्हणून त्यांनी हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे.
शिर्के हॉस्पिटल, रिलायन्स पंप मरवडे रोड आणि सोलापूर रोड, रिलायन्स मार्केट, रिलायन्स गॅस,जिओ डिस्टीब्युटर, मंगळवेढा शहर व कासेगाव जवळचे 40 गावे त्याचबरोबर इ-स्टोअर मॉल या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबीयाला आधार दिला आहे.
डॉ.शरद शिर्के वाढदिवस विशेष#Doctor @rajeshtope11 @Info_Solapur pic.twitter.com/oGGebs5s9F
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) March 29, 2021
आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे,एच.आय.व्ही व टी. बी तपासणी व प्रबोधन, डोळ्यांचे हजारो ऑपरेशन मोफत करून दिले आहेत. डॉ.शरद शिर्के यांच्या पाठीमागे सावलीसारख्या उभ्या असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती डॉ.प्रीती शिर्के यांनी मोलाची साथ दिली आहे.
आत्तापर्यंत डॉ.शरद शिर्के यांनी 5 हजार कडू लिंबाची मोफत झाडे वाटप केली आहेत.पाणी फौंडेशनला 1 लाख रुपयांची मदत त्यांनी केली आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून डोळ्यांचे शिबीरे मास्क वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना कपडे व अन्नवाटप करण्यात आले आहे.
कोरोना काळात अनेज गरीब कुटुंबियांना धान्य वाटप, जेवण, मोफत समाजप्रबोधन, त्याचबरोबर एम.पी.एल ,मंगळवेढा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आत्तापर्यंत अनेक क्रिकेट प्रेमींना संधी उपलब्ध करून दिली आहे.
साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग,विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वाटप ,फिल्टर पाण्याचे वाटप त्यांनी आजपर्यंत केलेले आहे.
दहावी व बारावी इंग्लिश स्कूल मंगळवेढा पूर्ण झाले दरम्यान सर्व शिक्षकांमुळे आपली प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या वाढदिवसा निमित्ताने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबूक, सोशल मिडीया, प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आशिर्वादही दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे… !!! असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशिर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ॥ पुनः एकदा धन्यवाद. डॉ.शरद शिर्के यांनी मानले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज