टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत.
अशातच माढा लोकसभा मतदारसंघाचीदेखील जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणं धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत. मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी आज माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
मात्र, त्यांना भाजपनं डावलले. निंबाळकरांनाच भाजपनं पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत हाती तुतारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळं माढा लोकसभेची राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द शरद पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार
दरम्यान, थोड्याच वेळात शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी मोडनिंबमध्ये येणार आहेत. सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्क्यावर धक्के देत असलेले पवार आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मोडनिंब येथील सभा झाल्यावर शरद पवार हे मोहोळ येथे सभा घेणार आहेत. मोहोळमध्ये भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज