मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराने निधन झालं. महेश कोठे सोलापूरचे माजी महापौर होते. प्रयागराज येथे कुंभमेळासाठी गेले असताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली. महेश कोठे यांचं पार्थिव प्रयागराजहून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे.
सोलापूर शहर उत्तर मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पराभवकेला होता.
शरद पवार यांच्या विश्वासातील नेते म्हणून महेश कोठे यांची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून महेश कोठे यांना लोक ओळखत होते.
महेश यांच्या निधनानं कोठे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकारणातला तरुण महापौर असलेला आणि शरद पवारांच्या सर्वात जवळचा नेता हरपल्याची भावना आहे. टविट करुन राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
2021 मध्ये शिवसेनेला रामराम करुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी ते काम करत होते. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. उत्तर मतदारसंघातून विजय देशमुख यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता
महेश कोठे यांची ओळख सर्वात तरुण महापौर म्हणून होती. शिवसेनेला रामराम ठोकण्याआधी सोलापूर महागरपालिकेचे ते विरोधीपक्षनेते म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यांनी सेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटात त्यांची एक विश्वासू नेते म्हणून ओळख होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज