mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग; अर्ध्या तासापासून शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात खलबतं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 29, 2021
in राज्य
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहेत.

इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर तासाभराने म्हणजे संध्याकाळी 4 च्या सुमारास स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे.

याशिवाय त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे. जर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.

सरकारचं डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसं सामोरं जायचं, या सर्व पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चर्चा होऊ शकते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत काल वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले.

संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली.

या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उद्धव ठाकरेवर्षा निवासस्थानशरद पवार

संबंधित बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 9, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
Next Post
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

एकेकाळी कॉंग्रेसमध्ये माझ्या शब्दाला किंमत होती, आता किती किंमत आहे माहित नाही; माजी मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

ताज्या बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 9, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा