टीम मंगळवेढा टाईम्स ।
आर्थिक क्षेत्राबरोबरच कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय, कापड , फर्निचर तसेच सूर्योदय मॉल सारख्या उद्योग आणि व्यवसायांमधून शेकडो तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या “सूर्योदय उद्योग समूह” संचलित सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींचा “जीवनगौरव पुरस्कार” देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
उद्योग व व्यापार, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक कार्य, विविध क्लब व संघटना, शिक्षण व संरक्षण तसेच प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून इतरांसमोर आदर्श उभा करत दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या काही ज्येष्ठ व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन म्हणून सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची माहिती देखील इंगवले यांनी यावेळी दिली.
उद्या शुक्रवार दि.18 जुलै रोजी दुपारी तीन वाजता सांगोला शहरातील अहिल्यादेवी सभागृहामध्ये ज्येष्ठ व्यक्तींसाठी स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून
आध्यात्मिक क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व सुभाष लऊळकर सर, सांगोला शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.मच्छिंद्र सोनलकर आणि आपुलकी प्रतिष्ठानचे प्रा.राजेंद्र यादव सर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पुणे येथील प्रसिद्ध विनोदी वक्ते अशोक देशमुख यांच्या कार्यक्रमाची मेजवानी देखील या स्नेहसंवाद मेळाव्यामध्ये असणार आहे.
सूर्योदय फाउंडेशनने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर अनेक गुणवंत रत्नांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन सन्मान केला असून वयाने ज्येष्ठ झाले तरी मनाने कायम चीरतरुण राहत विविध क्षेत्रांमध्ये आजही कार्यरत असणाऱ्या आणि सर्वांसाठी प्रेरक अशा पुढील व्यक्तींना या स्नेहसंवाद मेळाव्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा.डॉ.कृष्णा इंगोले, मोहन मस्के, माणिक भोसले, वैजीनाथ घोंगडे, मा एड. नागेश कुलकर्णी- खर्डीकर, एस टी खतीब, मधुकर कांबळे, वसंत दिघे, आशाताई सलगरे, प्रा.राजेंद्र ठोंबरे, विलास क्षीरसागर, साहेबलाल मुलानी, प्राचार्य शामराव शिंदे, सौ.प्रतिभा शेंडे,
प्रा.डॉ.विजयकुमार जाधव, विकास देशपांडे, शंकर डोंबे, रशीद तांबोळी, दत्तात्रय जाधव, रामचंद्र पाटील गुरुजी, प्राचार्य बजरंग लिगाडे, प्रा.भारत कसबे, कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सुभेदार बाळासाहेब पाटील, पोपट मिसाळ,
सुभेदार पंडितराव साळुंखे, मेजर भाऊसाहेब बाबर, प्रा.धनाजी चव्हाण, सौ शालिनी कुलकर्णी, श्रीपती आदलिंगे, उन्मेश आटपाडीकर, स्वाती अंकलगी, रमेश देशपांडे, सौ.प्रज्ञा चौगुले, सोमनाथ इंगोले आदी
ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहसंवाद मेळाव्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार वितरण आणि विनोदवीर अशोक देशमुख यांचा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक सर्वश्री डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज