mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, सोलापूर
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

 


समाधान फुगारे । सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर 20 दिवशी सोलापूर जिल्ह्याला नवीन लेडी पोलीस अधीक्षक मिळाले आहे.साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूरला बदली झाली असल्याचे आदेश निघाले आहेत.


दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली.मराठा आंदोलनानंतर मनोज पाटील यांनी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस दलाच्या निरोप घेऊन अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.

नवीन पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार कोण घेणार याची उत्सुकता राजकीय-सामाजिक गुन्हेगारी व अवैध धंद्यातील लोकांना लागून राहिली होती.

कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली


सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची बदली झाली होती. त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह पोलीस कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

पहिल्या वर्षभरात त्यांनी सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याला प्राधान्य दिले. स्वतः तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे चांगले टीमवर्क निर्माण झाल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा जिल्हा पोलीस दलाला यश आले. 

कायद्यावर बोट ठेवून, नियमांना अनुसरून तेजस्वी सातपुते काम करू लागल्यामुळे विविध पक्षातील राजकीय पदाधिकार्‍यांनी त्याचा धसका घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेक राजकीय विरोधक निर्माण झाले होते. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे सुरूच ठेवले होते.

तेजस्वी सातपुते यांनी सूत्रे स्वीकारण्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला म्हणावे तसे अधिकार दिले नव्हते. सातपुते यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार यांची बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई येथून सर्जेराव पाटील यांची बदली झाली.

मुंबई पोलीस दलात कामाचा प्रदीर्घ असणारा अनुभव पाहता तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण जबाबदारी सर्जेराव पाटील यांच्यावर सोपवली. सातपुते यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पावधीतच अनेक गुन्ह्यांचा उलगडा करत एकापाठोपाठ एक कारवायांचा धडाका लावला. अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले.

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सजन हंकारे, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अण्णासाहेब मांजरे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विशाल वायकर असे कर्तव्यदक्ष अधिकारी लागल्यामुळे सातारा शहर, तालुका आणि शाहूपुरी परिसरातील क्राइम रेट कमालीचा खाली आला.

त्यामध्ये तेजस्वी सातपुते यांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे पहिल्या दीड वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या खुनाच्या घटना सातारा जिल्हा पोलीस दलाने अल्पावधीतच उघडकीस आणत संशयितांना तत्काळ जेरबंद करत जिल्ह्यात फक्त कायद्याचेच राज्य चालते, हे दाखवून दिले.

सातारा जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला. वैद्यकीय क्षेत्रासह पोलीस दलापुढे हे एक मोठे आव्हान होते. सातारा जिल्ह्यात लॉकडाउन जारी झाल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे शिवधनुष्य सातारा जिल्हा पोलीस दलाने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लीलया पेलले. ही जबाबदारी पार पाडत असताना सातपुते यांनी पोलीस कर्मचार्‍यांना दिलासा देत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.


तरीही काही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यातच काही पोलिसांचा मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगी तेजस्वी सातपुते पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. सुमारे अडीच ते तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कराड येथे झालेल्या एका बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला होता.

तदनंतर झालेल्या कमराबंद बैठकीमध्ये काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील काही अधिकार्‍यांबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांची नावे समजली नव्हती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा केली होती.


दरम्यानच्या काळात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याचे लक्षात येतात तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांसाठी केवळ चार दिवसात कोरोना हॉस्पिटलची निर्मिती करत त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची बदली झाली. 

बदलीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या असे सांगण्यात आले. या घटनेला चार दिवस उलटतात तोच दोन दिवसांमध्ये गॅझेटनुसार होणार्‍या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे नाव असल्याचे वृत्त आज सकाळी थडकले.

सातपुते यांना कार्यभार स्वीकारून केवळ पावणेदोन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात त्यांनी केलेले काम सर्वांच्या समोर आहे. सातपुते यांचे नाव गॅझेटमध्ये कसे गेले असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. सातपुते यांची बदली राजकीय बळी तर नव्हे ना असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सातारा जिल्ह्यातून उठाव होणार का?..

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांची होणारी छेडछाड हा मुद्दा तेजस्वी सातपुते यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला होता. याबाबत विविध महाविद्यालयांशी चर्चा करून, विद्यार्थिनींचे मेळावे घेऊन त्यामध्ये स्वरक्षण कसे करायचे, याबाबत धडे दिले जात होते. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवून सातारा जिल्हा पोलीस दल तुमच्या पाठीशी आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते.

मुलींच्या संरक्षणाशिवाय सातारा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करणे, गुंडांना हद्दपार करणे अशा अनेक कारवाया करून सातपुते यांनी जिल्हा भयमुक्त होण्यास मदत केली होती. अशा अधिकार्‍याची केवळ पावणेदोन वर्षात बदली होत असल्यामुळे जिल्ह्यातून या बदलीच्या विरोधात उठाव होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Satara Superintendent of Police Tejaswi Satpute transferred to Solapur

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 2, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 2, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा