टीम मंगळवेढा टाईम्स ।
ज्या गावात कोरोना लसीकरण कमी होईल अशा गावातील सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 64 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींचे 100 टक्के लसीकरण झालेले आहे. अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे.
लसीकरण वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावांमध्ये दिवाळीपूर्वी तीन दिवसांचा मेगा लसीकरण कॅम्प घेण्यात येणार आहे.
यामध्ये ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग कमी असेल किंवा लसीकरण अत्यंत कमी होईल अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल.
याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला.(स्रोत:साम TV )
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज