टीम मंगळवेढा टाईम्स।
नुकत्याच जाहीर झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निकालानंतर भाजपचे आ.समाधान आवताडे गट, परिचारक गट, भालके गट व बबनराव आवताडे गट यांनी सर्वाधिक जागा आपल्या गटाने जिंकल्याचे जाहीर केले होते.
मात्र, या दाव्याला पाठखळ, बावची, खोमनाळ, सोड्डी या गावांतील सरपंचांनी आम्ही फक्त बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर आवताडे यांच्या नेतृत्वात काम करीत आहोत,
इतर कोणताही पक्ष, नेता, संघटना आम्ही त्यांच्या गटाकडून निवडून आले असल्याचे सांगत असतील तर ते चुकीचे असल्याचे लेखी खुलासे दिले आहेत.
यावेळी त्यांनी बबनराव आवताडे यांची भेट घेत त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला. मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार कार्यालयातून १६ पैकी ११ जागांवर विजय संपादन केल्याचा दावा केला होता. त्यानंतर भालके गटाकडूनदेखील दहा जागांवर भालके गटाचे सरपंच निवडून आल्याचे सांगितले होते.
परिचारक गटाकडूनदेखील अनेक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये बबनराव अवताडे गटाने चार ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद मिळवण्यात यश आल्याचे जाहीर केले होते;
तर संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या समविचारी आघाडीने १६ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींत आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. या गावांमध्ये समविचारी आघाडीच्या नेतृत्वातच गावाचा विकास घडवून येईल, असे सांगत मंगळवेढ्यामध्ये फलकबाजीदेखील केली आहे.
निवडून आलेल्या सदस्य आणि सरपंचांना प्रत्येक गटाने पक्षाने ते आपल्याच पक्षाचे असल्याचे सांगायला सुरुवात केली. तसेच निवडून आलेले सदस्य आणि सरपंच यामुळे येणाऱ्या देखील प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने तालुक्यातील राजकीय विश्लेषकांना कोण कोणत्या गट- तटामध्ये आहे, याबाबत अंदाज येत नव्हता.
दिवसभर सर्व पक्ष कार्यालयांमध्ये सत्कार स्वीकारणाच्या सरपंच व सदस्यांना पाटखळ, बावची, खोमनाळ, सोड्डी या ग्रामपंचायतींवर सरपंच म्हणून निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये खुलासा दिला आहे.
यामध्ये आपण फक्त बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर आवताडे यांच्या गटाचे आहोत. इतर कोणीही आमच्यावर त्यांच्या गटाचे असल्याचे सांगु नये, असे लेखी खुलासेच दिले आहेत.
येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लागलेल्या निकालानंतर स्थानिक पातळीवरील गट-तटांमध्ये संघर्ष वाढत जाणार असल्याचे बोलले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज