mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोव्हिड सेंटरसाठी सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत,तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 2, 2021
in सोलापूर
Breaking! कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगल कार्यालय,पाच हॉटेल सील; पोलिसांनी केला मोठा दंड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील खवणी येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत, कोरोना संसर्ग रोखण्याच्या शासनाच्या प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गावकामगार तलाठी व ग्रामसेवक गावात येत नसल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालयाला सरपंच व ग्रामस्थांनी टाळे ठोकून निषेध व्यक्त केला आहे

या टाळे ठोको आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तलाठी व ग्रामसेवक गावात येत नाहीत. नवीन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना ग्रामपंचायतीचे दप्तर, बॅंक खाते, प्रोसिडिंग पुस्तक, पाणीपुरवठा, वीज वितरण पद्धतीचे दप्तर अद्याप दाखविण्यात आले नाही, यासह विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर सरपंच शीतल यमगर, उपसरपंच सिंदू बोबडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश खिलारे, रेखा भोसले, सुरेखा भोसले, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे संजीव खिलारे, सूर्यकांत भोसले, सचिन भोसले, महादेव यमगर, तेजस बोबडे, ज्योतिराम सचिन शिंदे आदींच्या सह्या आहेत.

दरम्यान, झालेल्या आरोपांबाबत ग्रामसेवक मिलिंद तांबिले म्हणाले, बाभळगाव व खवणी या दोन गावांचा पदभार माझ्याकडे आहे. आठवड्यातून दोन दिवस मी खवणी येथील कार्यालयामध्ये उपस्थित असतो. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या गावपातळीवरील राजकारणामुळे कदाचित माझ्यावर हे आरोप केले जात असावेत.

तर तलाठी मंगेश बनसोडे यांनी सांगितले की, माझ्याकडे खवणी व पोखरापूर या दोन गावांचा कार्यभार असून मुख्य कार्यालय पोखरापूर येथे आहे. आवश्‍यकता असेल तेव्हा प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन कार्यालयीन कामकाज करीत असतो.

जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक गावे प्रयत्नशील आहेत. अनेक गावांमध्ये कोरोनाचा अटकाव होत आहे तर काही गावांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतच आहे.

दरम्यान, खवणी गावात वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन करावे लागले. प्रशासनाने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोविड सेंटरग्रामपंचायत

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मुलगा न झाल्याने पत्नीसह तीन मुलींना दीड वर्षांपासून ठेवले डांबून; निर्भया पथकाने केली सुटका

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..