टीम मंगळवेढा टाईम्स।
नुकताच श्री संत दामाजी कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना सणासुदीला मिळणारी 10 रुपये किलोची साखर 20 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याला संचालक सिध्देश्वर आवताडे यांनी तीव्र विरोध केला असून सभासद शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे 10 रुपये किलो प्रमाणे साखर द्या अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची गुढीपाडवा या सणासाठी मिळणारी साखर सभासदांना 10 रुपये प्रमाणे देण्यात यावी अशी मागणी संचालक सिद्धेश्वर आवताडे यांनी दामाजी कारखाना प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला गुढी पाडवा सण जवळ आला असुन या सणासाठी श्री संत दामाजी कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखर देण्यात यावी.
ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस दिला आहे. शेतकऱ्यांमुळे कारखाना यशस्वी गाळप करू शकला आहे. त्यामुळे गुढीपाडवा सण गोड व्हावा यासाठी सभासदांना 10 रुपये किलो प्रमाणे साखर वाटप करावी.
पुुढील हंगामासाठी तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढलेले आहे.तसेच उजनी धरणामध्येही पुरेसे पाणी असल्याने पुढील गळीत हंगामामध्ये आपल्या कारखान्यास मोठया प्रमाणात गळीतासाठी ऊस उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडवा सणासाठी सभासदांना दहा रुपये किलो प्रमाणे साखर द्यावी व सभासद शेतकऱ्यांचा पाडवा गोड करावा अशी मागणी देखील आवताडे यांनी केली आहे.
दरम्यान, संचालक सिध्देश्वर आवताडे यांनी सभासद शेतकऱ्यांची भावना ओळखून चेअरमन शिवानंद पाटील यांच्याकडे मागणी केली असून यावर कारखाना काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज