टीम मंगळवेढा टाईम्स ।
कृषि व संलग्न पदवीधरांनी संग्रामदादा देशमुख यांनाच पहीली पसंती देणे आपल्या हीताचे आहे त्यांनाच आपल्या ला निवडून आणायचे आहे असे प्रतिपादन पुणे येथील मेळाव्यात कृषि पदवीधर संघटना चे प्रदेशाध्यक्ष महेश कडूस पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांना केले आहे.
पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील कृषि व संलग्न पदवीधर आणि कृषि पदवीधर असलेले ग्रामसेवक तलाठी प्राध्यापक शिक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
हा पाठींबा देताना व निवडणूकीत सक्रिय होताना सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झाला असे त्यांनी सांगितले. दोन व तीन क्रमांकाच्या पसंती चा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे देखील ते म्हणाले.
निवडणुकीत पक्षा कडून जे कृषि पदवीधर उभे आहेत. त्यांचे कृषि क्षेत्रातील तरुणांसाठी काम नाही. निवडणूक लढविण्याचा त्यांचा अट्टाहास आहे. हाच अट्टाहास ठेवून त्यांनी मधल्या सहा वर्षांत कृषि पदवीधर यांच्या करता थेट काम करणे अपेक्षित होते.
२०१४ साली सारंग पाटील राष्ट्रवादी कडून उभे असताना देखील त्यांचा असाच अट्टाहास ठेवल्याने मत विभाजन झाले. सारंग पाटील यांच्या मैत्री मुळे आम्ही शेवट पर्यंत सारंग पाटील यांच्या मागे उभे राहीलो.
ते मेरीट असलेले उमेदवार होते. म्हणून या पाठींबा देण्या मागे कोणतेही राजकारण नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कृषि पदवीधर यांनी भावनिक साद घालणाऱ्या ना दूर ठेवावे,
सध्या मी माझ्या संघटनेने पक्ष पाहीला नाही तर उमेदवार बघून आम्ही संग्राम दादा यांना पाठिंबा देत असल्याचे कडूस पाटील म्हणाले. सध्या ज्यांचे सरकार आहे त्यांनी लॉकडाऊन मधे पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत.
तरुणांवर बेरोजगारी ची कुऱ्हाड कोसळली आहे. बँका कर्ज देत नाहीत. या सरकार कडे पदवीधरां करता ठोस कार्यक्रम नाही. कृषि विद्यापीठातील भरती रखडलेली आहे याच बरोबर सातवा वेतन आयोग दिला नाही.
फक्त आश्वासन किती दिवस ऐकायचे? आणि या सरकारने कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे अशी टीका कडूस पाटील यांनी केली.
महेश कडूस पाटील यांनी, आपल्या संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षांत कडूस पाटील यांनी कृषि पदवीधरां करता जी कामे रस्त्यावर उतरून आंदोलन करुन केली त्या पदवीधर तरुणांची मते ही संग्राम दादा देशमुख यांनाच मिळणार आहेत असा विश्वास या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र निरिक्षक संग्रामसिंह बुचडे यांनी या वेळी व्यक्त केला.
आजपासून कृषि पदवीधर संघटना चे सर्व कार्यकर्ते भाजप उमेदवार संग्राम दादा देशमुख यांच्या प्रचारार्थ सक्रिय होतील असे संघटना युवक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वीर पाटील यांनी सांगितले. या वेळी कृषि पदवीधर संघटना चे स्वप्नजित माने, महेंद्र बोरगे, प्रकाश यादव अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज