शेततळ्यामध्ये पाय घसरून दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वझरे गावात शोककळा पसरली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील वझरे (ता.सांगोला) येथील अंतर्गत असलेल्या कोकरे वस्ती येथे घडली आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर दोघीं बहिणींचाच मृतदेह शेत तळ्यातून बाहेर काढण्यात आला आहे.
त्या दोघींची आई डाळिंब तोडण्यास शेतात गेली असताना मुली शेततळ्यावर गेल्यावर पाय घसरून पडलेचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याचे समजते. आई घरी कामावरुन आल्यानंतर मुली दिसून आले नाहीत, म्हणून शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली असून या घटनेने वझरे गावात शोककळा पसरली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज